मुंबई

केडीएमसीची पावसाळी आपत्कालीन परिस्थितीसाठी यंत्रणा सज्ज

CD

पावसाळी आपत्कालीन परिस्थितीसाठी यंत्रणा सज्ज
कल्याण, ता. २४ (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली महापालिकेची यंदा पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन मनपा यंत्रणा सज्ज आहे. आपत्कालीन परिस्थितीत महापालिकेची यंत्रणा जलद गतीने राबविण्यात यावी, या दृष्टिकोनातून आयुक्त अभिनव गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी, कर्मचारीवर्गाला आचार्य अत्रे रंगमंदिर येथे प्रशिक्षणदेखील देण्यात आले, अशी माहिती आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संजय जाधव यांनी दिली आहे.

पावसाळ्यामध्ये आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी आयुक्तांच्या निर्देशानुसार महापालिकेच्या १० प्रभागांत आपत्ती व्यवस्थापन केंद्र उभारले आहेत. या ठिकाणी सहाय्यक आयुक्तांच्या अधिनस्त सर्व संबंधित विभागातील अधिकारी, कर्मचारी यांची नेमणूक केली आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक प्रभागातील आपत्कालीन परिस्थितीवर पर्यवेक्षण व नियंत्रण ठेवण्यासाठी नोडल अधिकारी म्हणून प्रभागनिहाय उपायुक्त वर्गाची नेमणूक केली आहे.

टोल फ्री क्रमांक उपलब्ध
महापालिका मुख्यालयातही (आपत्कालीन) मुख्य नियंत्रण कक्ष कार्यान्वित केला असून, हा कक्ष ३० ऑक्टोबरपर्यंत कार्यरत राहणार आहे. हा मुख्य नियंत्रण कक्ष सकाळी ६ ते दुपारी २, दुपारी २ ते रात्री १० आणि रात्री १० ते सकाळी ६ या तीन सत्रात सुरू राहणार आहे. या मुख्य नियंत्रण कक्षावर रात्रीच्या सत्रात पर्यवेक्षण करण्यासाठी वर्ग एक व वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी महापालिका मुख्यालयातील मुख्य नियंत्रण कक्षात १८००२३३७३८३ आणि १८ ००२३३४३९२ हे टोल फ्री क्रमांक उपलब्ध करण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जय शिवराय! 'या' सिनेमागृहात 'राजा शिवाजी' सिनेमा मोफत पाहता येणार, पहा संपूर्ण यादी

HSC result 2026 Maharashtra : बारावीचा निकाल 2 मे रोजी, 'या' लिंकवर निकाल पाहता येणार

Sunetra Pawar Banner in Pandharpur : 'माझा विठ्ठल...!' देवघरात अजितदादांची प्रतिमा, आता पंढरपूरच्या वेशीवर सुनेत्रा पवारांसाठी 'तो' बॅनर चर्चेत!

Mumbai Pune Expressway Traffic : वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहनांकडून टोल घेऊ नका, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सूचना

Who is Arshad Khan? मुंबई इंडियन्सने पहिली संधी दिली अन् तो आता गुजरात टायटन्ससाठी ठरतोय एक्स फॅक्टर; RCB लाही दिलाय त्रास

SCROLL FOR NEXT