मुंबई

प्लॅस्टिकमुक्त गावासाठी सामूहिक कृती गरजेची

CD

प्लॅस्टिकमुक्त गावासाठी सामूहिक कृती गरजेची
छायादेवी शिसोदे यांचे प्रतिपादन : ठाण्यात स्वच्छ भारत मिशन राबविणार
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २४ : प्लॅस्टिकमुक्त गावांची संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी ग्रामपातळीवर सामूहिक कृती गरजेची आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने सहभागी होणे आवश्यक आहे. ही मोहीम केवळ एक उपक्रम न राहता, प्लॅस्टिकमुक्त ग्राम करण्यासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध असल्याचे मत मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी व्यक्त केले.
केंद्र व राज्य शासनाच्या पर्यावरण आणि स्वच्छतेविषयक मार्गदर्शक सूचनांनुसार ठाणे जिल्हा परिषदअंतर्गत ग्रामीण भागात स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत ‘प्लॅस्टिकमुक्त ग्राम’ अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. २२ मे ते ५ जून या कालावधीत विविध उपक्रम राबवून ही मोहीम जनजागृतीपूर्वक पार पाडण्यात येणार आहे. या अभियानाचा शुभारंभ पर्यावरण शपथ घेऊन करण्यात येणार आहे. ग्रामस्थांना अभियानात सक्रिय सहभागासाठी जिल्हा परिषदेमार्फत आवाहन करण्यात येत आहे. या वेळी ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता विभागप्रमुख प्रमोद काळे यांनी सांगितले की, या मोहिमेंतर्गत प्लॅस्टिकमुक्तीसाठी विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.
विशेषतः ‘मासिक पाळी व्यवस्थापन दिन’, ‘थीम एक पृथ्वी, एक आरोग्य’ या उपक्रमांद्वारे शाळा, अंगणवाड्या, आरोग्य केंद्रे यामधून महिलांमध्ये स्वच्छतेबाबत जागृती करण्यात येणार आहे. ही मोहीम उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक व स्थानिक स्वच्छता समिती यांच्या समन्वयाने यशस्वी करण्यात येणार असल्याचेही या वेळी सांगण्यात आले.

................................
अभियानाचे ठळक वैशिष्ट्ये :
• २२ मे : पर्यावरण शपथ व जनजागृती रॅली
• २८ मे : मासिक पाळी व्यवस्थापन दिन-शाळांमधून किशोरवयीन मुलींसाठी मार्गदर्शन
• २९ मे : ‘थीम एक पृथ्वी, एक आरोग्य’ दिन-योग दिनानिमित्त आरोग्यविषयक उपक्रम
• ग्रामसभा, रॅली, प्रदर्शन, महिला बचत गट, युवक मंडळे यांच्या सहभागातून विविध सर्जनशील उपक्रम

--

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story : जिद्दीला सलाम! दोन मुलांचा सांभाळ अन् मोलमजुरी करत निशाने केली 12वी उत्तीर्ण; मिळवले ६८.३३% गुण

Judge Suicide: धक्कादायक! न्यायाधीशांनी जीवन संपवलं; मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला, घटनेनं खळबळ

Yerla River Incident : लग्नासाठी आली अन् काळानं घाला घातला! येरळा नदीत पोहण्यास गेलेल्या 20 वर्षीय तरुणीचा बुडून मृत्यू; सात मुलांना पाण्याबाहेर काढण्यात यश

CSK vs MI Live: पुण्याच्या पोराने कमाल केली! आधी अफलातून झेल टिपला, नंतर सूर्यकुमार यादवची विकेट घेत दिला तगडा झटका Video

Indapur Accident : इंदापूरमध्ये भरधाव कारचा थरार; झाडाखाली उभ्या तीन वाहनांना धडक

SCROLL FOR NEXT