मुंबई

‘संविधान आणि कायदा’ पुस्तकाचे प्रकाशन

CD

खारघर, ता. २४ (बातमीदार) : ‘भारतीय संविधान आणि कायदा’ या अभ्यासपूर्ण पुस्तकाचे प्रकाशन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या हस्ते खारघरमध्ये करण्यात आले. या वेळी आठवले म्हणाले, ‘हे पुस्तक डॉ. विजय ग. मोरे यांचे चौथे प्रकाशित पुस्तक असून, ते स्वतः रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या युवक आघाडीचे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस आहेत. मोरे हे एक विद्वान लेखक, अभ्यासू प्राध्यापक आणि संविधान जागृतीचे कार्य करणारे विचारवंत आहेत, याचा मला अत्यंत आनंद आणि अभिमान वाटतो. ‘भारतीय संविधान आणि कायदा’ हे पुस्तक सर्व शाखांतील विद्यार्थ्यांसाठी तसेच सामान्य नागरिकांसाठीही मार्गदर्शक ठरेल.’ या वेळी डॉ. मोरे यांच्या आईचा ७५वा वाढदिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमास दीपक निकाळजे, गौतम सोनवणे, ॲड. बी. के. बर्वे, सुरेश बारशिंग, पप्पू कागदे, दयाल बहादूर, डॉ. मृदुल निळे, प्रा. अनिल बनकर, डॉ. जी. के. डोंगरगावकर, प्राचार्य डॉ. शीतला गावंड, सुनील कदम, सिद्राम ओहोळ, ॲड. बापूराव जाधव, नरेंद्र गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Village of Widows : विधवांचे गाव ! इथे ७० टक्के महिला तरुणपणीच गमावतात पती; काय आहे मृत्युचे धक्कादायक वास्तव?

बीडमध्ये हे काय चाललंय? थाळी एकच पण जेवले 50 जण, शिवभोजन थाळीत 'डिजीटल भ्रष्टाचार'

Patanjali: रामदेव बाबांना हायकोर्टाचा मोठा दणका; डाबर च्यवनप्राशची बदनामी करणाऱ्या जाहिरातींवर घातली बंदी

कर्नाटकातील काँग्रेस सरकार संकटात? उपमुख्यमंत्री DK शिवकुमारांनी घेतली महत्त्वाची भूमिका; म्हणाले, 'माझ्याकडे दुसरा पर्याय..'

Woman Doctor Ends Life : स्वतःवर ब्लेडने वार करून डॉक्टर महिलेनं संपवलं जीवन, पतीदेखील वैद्यकीय अधिकारी; धक्कादायक कारण समोर...

SCROLL FOR NEXT