मुंबई

खरीप शेती प्रकियासंदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन

CD

खरीप शेती प्रकियासंदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन
उरण, ता. २४ (वार्ताहर) ः कृषी विभागातर्फे आमदार महेश बालदी यांच्या अध्यक्षतेखाली उरण पंचायत समिती सभागृहात खरीप आढावा बैठक नुकतीच पार पडली. या वेळी उरण तालुक्यातील कृषी अधिकारी अर्चना सुळ यांनी खरीप हंगाम २०२५चे सादरीकरण व नियोजनाबद्दल माहिती दिली. कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया, उगवण क्षमता चाचणी तसेच भातपिकाचे विविध वाण याबद्दल प्रदर्शन व सखोल माहिती देण्यात आली. तसेच आमदार महेश बालदी यांनी शेतकऱ्यांच्या विविध समस्या ऐकून घेऊन त्यांना मार्गदर्शन केले. तसेच त्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी, उरण गटविकास अधिकारी समीर वाठारकर, नायब तहसीलदार महेश पाटील, तालुका कृषी अधिकारी अर्चना सुळ, एस. डी. गटकळ, कृषी पर्यवेक्षक बी. वाय. धेंडे, एस. व्ही. लोहकरे, ए. डी. बुरकूल तसेच उरण तालुक्यातील पुरस्कार प्राप्त प्रगतशील शेतकरी, तसेच पीएमएफएमईमधील महिला व्यावसायिक, महिला बचत गट व कृषी सेवा केंद्रधारक, पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियान व एफपीओचे सदस्य, असे एकूण ११५ जण उपस्‍थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Nandini Sharma? महिला प्रीमिअर लीग गाजवली अन् थेट ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघात एन्ट्री; हॅटट्रिकचा अनोखा विक्रम नावावर...

चाकणमध्ये ३ वर्षांच्या बालकावर अनैसर्गिक अत्याचार, मृतदेह सुटकेसमध्ये भरला अन्...; बिहारमधील मुलाचं कृत्य

कारला एसटी बस घासली, चालकाची सटकली; बस ड्रायव्हरसह महिला प्रवाशांसोबत धक्कादायक कृत्य, मुंबईत खळबळ

महागडे तिकीट टळले! संजय गांधी नॅशनल पार्कमधील तिकीट दरवाढीचा निर्णय मागे; मुंबईकरांच्या संतापानंतर प्रशासन नरमलं

14 व्या वर्षी लग्न, सासरी सहन केला नाहक त्रास, 450 सिनेमांमध्ये काम करुनही झाला दुर्देवी अंत, कोण होती अभिनेत्री?

SCROLL FOR NEXT