मुंबई

कागदी पुठ्ठ्याच्या गोदामाला भीषण आग

CD

उल्हासनगर, ता. २४ (वार्ताहर) : शहरातील गजबजलेल्या आणि वस्तीशी लागून असलेल्या रिजन्सी अँटीलिया संकुलाच्या शेजारील कागदी पुठ्ठा, फायबर मटेरियल व भंगार साठवणाऱ्या गोदामाला शनिवारी (ता. २४) सकाळच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. काही मिनिटांतच आगीने उग्र रूप घेत संपूर्ण परिसरात धुराचे लोळ पसरले होते. यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली होती.
गोदामात मोठ्या प्रमाणात कागद, पुठ्ठे आणि इतर ज्वलनशील साहित्य असल्यामुळे आग वेगाने पसरली. आगीची तीव्रता इतकी होती की काही मिनिटांतच संपूर्ण गोदाम जळून गेले. घटनास्थळी पोहोचलेल्या उल्हासनगर महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या चार, कल्याण डोंबिवलीची एक आणि सेंच्युरी कंपनीची एक गाडी यांनी तातडीने पाण्याचा मारा करत आग विझवण्याची मोहीम सुरू केली होती. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, सकाळच्या वेळेस अचानक धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळा पाहून नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी गोदामालगत असलेल्या इमारतींना आगीची झळ लागू नये, म्हणून आगीचा फैलाव रोखण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले, तरी प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किटमुळे लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही; मात्र गोदामातील मालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. घटनेनंतर महापालिका प्रशासन, अग्निशमन विभाग, पोलिस अधिकारी आणि स्थानिक प्रतिनिधी घटनास्थळी उपस्थित होते. संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला असून, यानिमित्त रहिवासी वस्तीतील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EVMवर भाजपच्या पर्यायावर टेप लावल्याची तक्रार; निवडणूक आयोग म्हणाले, खरं असेल तर पुन्हा मतदान घेऊ

Ambabai Temple Kolhapur : करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरात ओवरीतून उलगडला पुरातन ठेवा; महादेव पिंड, नंदीसह देव-देवतांच्या मूर्तींचे झाले दर्शन

Personal Loan vs Credit Card EMI: क्रेडिट कार्डचं बिल वाढलंय? EMI की पर्सनल लोन! कोणता पर्याय वाचवेल हजारो रुपये?

Latest Marathi News Live Update: सोलापुरात मुलांचा भन्नाट जुगाड! विहीर-कालव्यातच तयार केलं ‘नैसर्गिक वॉटर पार्क’

राज्यात हरित महाराष्ट्र आयोगाची स्थापना, ३०० कोटी वृष लागवड करणार; मंत्रीमंडळ बैठकीत मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT