मुंबई

अंबरनाथला स्वामी समर्थ चौकात उड्डाणपुलाची मागणी

CD

अंबरनाथ, ता. २४ (बातमीदार) : वाहनांच्या वाढत्या वर्दळीमुळे अपघाताच्या घटना टाळण्यासाठी अंबरनाथच्या पूर्व भागातील स्वामी समर्थ चौकात उड्डाणपूल बांधण्याची मागणी भाजपच्या वतीने होत आहे. स्वामी समर्थ चौकात पाच रस्ते एकत्र येत असून, सगळ्या बाजूंनी येणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत आहे. सततच्या वाहतूक कोंडीने नागरिकांना चालताना वाहनांच्या वर्दळीतून वाट काढत जीव मुठीत घेऊन चालावे लागते.
अंबरनाथ स्थानकावरून शिवमंदिरमार्गे उल्हासनगरकडे येथूनच जावे लागते. याशिवाय लोकनगरी नवीन बायपास रस्ता, आनंदनगर एमआयडीसी, खेर विभागातून वडवली; तसेच हुतात्मा चौक आणि कानसई कडे स्वामी समर्थ चौकाशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यातच एएमपी गेट परिसरात नवीन रेल्वे उड्डाणपूल बांधण्याचे काम प्रगतिपथावर आहे. उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू झाल्यास भविष्यात या पुलावरील अवजड वाहने हुतात्मा चौकमार्गे स्वामी समर्थ चौकातून जाण्याचा एकमेव मार्ग आहे. कायम वर्दळीमुळे मागील वर्षी झालेल्या अपघातात दुचाकीवरून जाणाऱ्या मायलेकींना ट्रकने दिलेल्या धडकेने गंभीर दुखापत झाली होती. अपघात होण्याचे प्रमाण वाढल्याने चौकात शिवदर्शन बंगला ते लोकनगरी बायपासपर्यंत उड्डाणपूल बांधावा, अशी मागणी भाजपचे कल्याण जिल्हा उपाध्यक्ष संजय आदक आणि माजी नगरसेविका अनिता आदक यांनी नगरपालिकेकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfers: महाराष्ट्रात पोलीस दलात मोठा फेरबदल! २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली; कुणाची कुठे नेमणूक? जाणून घ्या यादी...

IPL 2026 Point Table: गुजरात टायटन्सने विजय मिळवून PlayOff ची चुरस अधिक रंजक बनवली; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज मात

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Pune News : पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील ३२ अधिकारी, अंमलदारांचा समावेश

SCROLL FOR NEXT