अंबरनाथ, ता. २४ (वार्ताहर) : अंबरनाथमध्ये दोन तरुणांना भररस्त्यात अडवून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यासाठी हातात कुऱ्हाड घेऊन टोळी मागे लागल्याची घटना घडली होती. याप्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी तब्बल दीड महिन्यांनी गुन्हा दाखल केला आहे.
अंबरनाथ पश्चिमेच्या केटी स्टील परिसरात ३ एप्रिलला दुपारी ४ च्या सुमारास मोईनुद्दीन शेख (वय २९) आणि त्यांचा भाचा नवाज अकील हे दोघे दुचाकीवर जात होते. मात्र, आधीपासून सापळा रचून बसलेल्या चार अनोळखी तरुणांनी गाड्या आडव्या टाकत त्यांना अडवले. या प्रकाराने घाबरलेल्या दोघांनी सीएनजी पंपावर पळ काढला. या टोळीने त्यांचा हातात कुऱ्हाड घेऊन पाठलाग केला. मात्र, दोघा तरुणांनी सीएनजी पंप कार्यालयात लपल्याने त्यांचा जीव वाचला होता. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीतही कैद झाली होती. याप्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी फक्त एनसी नोंदवून घेतल्याने शेख यांनी पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्यानंतर या प्रकरणाची पुन्हा एकदा नव्याने चौकशी होऊन अखेर अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी गुरुवारी (ता. २२) गुन्हा दाखल केला. मात्र, या गुन्ह्यात सात वर्षांपेक्षा कमी शिक्षा असल्यामुळे आरोपींना अटक करण्याची तजवीज नसल्याची माहिती पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.