मुंबई

अर्नाळा किल्ल्यामध्ये वादळाचा हाहाकार

CD

वसई, ता. २४ (बातमीदार) : हवामान विभागाने इशारा दिल्याप्रमाणे अर्नाळा किल्ला येथे शुक्रवारी (ता. २३) वादळाने हाहाकार उडवला. स्थानिकांच्या मासळीसह घरा-दाराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जोरदार लाटांचा मारा, वादळी वारा आल्याने अवघ्या पाच मिनिटांत घराचे पत्रे उडाले. अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पुढे काय होईल, या चिंतेने मुलेदेखील उपाशी राहिली, असे वास्तव सांगताना मच्छीमार बांधवांच्या अश्रूंचा बांध फुटला.

हवामान विभागाने वादळाचा इशारा दिल्यावर मच्छीमारांनी बोटी किनारी नांगरल्या आहेत, तर समुद्रातील अनेकांनी घराच्या दिशेने वाट धरली होती. अर्नाळा किल्ला येथील बहुतांश नागरिक हे मासेमारीवर अवलंबून आहेत, परंतु अवकाळी पाऊस आणि वारा अशा दुहेरी संकटात सापडले आहेत. अचानक समुद्रात वादळाची परिस्थिती निर्माण झाली आणि क्षणातच जेट्टीजवळ व गावाला लाटांचा मारा सुरू झाला. या लाटा सात ते आठ फूट उंच होत्या. त्यातच वारे जोरदार आल्याने घरांवरील पत्रे उडाले. त्यामुळे सुमारे सात ते आठ घरांना वादळाचा फटका बसला.

घरातील पाणी उपसा करण्यासाठी नागरिकांची धावपळ उडाली, तर पत्रे उडाल्याने झोपण्याची व्यवस्था ढासळली. सुकी मासळीदेखील वाऱ्यामुळे वाहून गेली. त्यामुळे हजारोंचे नुकसान सहन करावे लागले. याव्यतिरिक्त मालमत्तेचीदेखील हानी झाली आहे. या वादळामुळे शेकडोंच्या संख्येने पत्रे उडाल्याने तुटले. त्यामुळे नागरिकांना मोठे नुकसान सहन करावे लागले आहे, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

एकीकडे समुद्रात येणारी नैसर्गिक आपत्ती आणि त्यात व्यवसायावर आर्थिक संकटाचा मारा सहन करणाऱ्या मच्छीमार बांधवांना अवकाळी पाऊस आणि वाऱ्याने झोडपले. सरकारने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी मच्छीमार करू लागले आहेत.

अचानक वादळ वारा आला व घराचे पत्रे तुटले. काही दिवसांपूर्वी घराची दुरुस्ती केली होती, मात्र सर्व काही पाण्यात गेले. घरात शिरलेले पाणी काढण्यासाठी तारांबळ उडाली. त्यामुळे मुला-बाळांच्या आमच्या पोटात अन्नाचा कण नव्हता. रात्रभर भीतीदायक वातावरण निर्माण झाले. नुकसानीची पंचनामा करत आर्थिक हातभार लावावा.
- दमयंती वसंत मेहेर, नुकसानग्रस्त अर्नाळा किल्ला गाव

अवघ्या पाच मिनिटांत जोरदार वाऱ्यामुळे घरावरील ५५ पत्रे उडाले, तसेच घरात पाणी आले. रात्रभर लाटांचा जोरदार मारा सुरू होता. सुकी मासळी वाळत ठेवली होती, मात्र तीदेखील भिजून गेली. त्यामुळे ३० ते ४० हजारांच्या मासळीचे व घराचेदेखील नुकसान झाले. सरकारने तातडीने नुकसानीची दखल घेऊन मच्छीमार बांधवांना मदत करावी.
- उमेश मेहेर, अर्नाळा किल्ला गाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra HSC Result 2026 : बारावीचा निकाल आज जाहीर होणार! दुपारी 1 वाजल्यापासून 'या' अधिकृत लिंकवर पाहता येईल रिझल्ट, यंदा कोण मारणार बाजी?

RBI New Rules 2026 : क्रेडिट कार्ड, यूपीआय ते एटीएम; १ मेपासून काय बदललं? थेट खिशावर परिणाम

IPL 2026: मुंबई इंडियन्स vs चेन्नई सुपर किंग्स; करो या मरो सामना, रोहित धोनी चर्चेत, पण प्रत्यक्षात कोण खेळणार? पाहा कशी असेल Playing XI

Maharashtra Weather Update : कोकणात ढगाळ तर विदर्भात विजांचा कडकडाट! मे महिन्याच्या सुरुवातीलाच वरुणराजाची एन्ट्री; काय सांगतोय IMD चा अंदाज?

Software Engineer Privacy : भाड्याच्या घरात आंघोळ करणाऱ्या 23 वर्षीय सॉफ्टवेअर अभियंता तरुणीचा गुप्तपणे काढला व्हिडिओ; 30 वर्षीय MBA पदवीधराचं घृणास्पद कृत्य

SCROLL FOR NEXT