मुंबई

विजेच्या झटका लागून तरुण जखमी

CD

विजेचा झटका लागून तरुण जखमी
उल्हासनगर, ता. २४ (वार्ताहर) : उल्हासनगर कॅम्प-३ येथील काजल पेट्रोलपंपाजवळील कृष्णा ट्रान्सपोर्ट येथे शुक्रवारी (ता. २३) दुपारी काम करीत असलेल्या तरुणाला हायव्होल्टेज विजेचा जोरदार झटका बसल्याची धक्कादायक घटना घडली. या अपघातात संतोष आढाव नावाचा तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
शुक्रवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास संतोष आढाव कृष्णा ट्रान्सपोर्टच्या इमारतीच्या छतावर प्लास्टिक शीट टाकण्याचे काम करीत होता. या वेळी त्याचा अचानक संपर्क छताच्या वरून जाणाऱ्या उच्चदाब वीजवाहिनीशी झाला आणि त्याला तीव्र विजेचा धक्का बसला. विजेचा झटका इतका जोरदार होता की तो जागेवरच बेशुद्ध झाला. अपघात होताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत संतोषला छतावरून सुरक्षितपणे खाली उतरवले आणि जवळील मॅक्स लाइफ हॉस्पिटलमध्ये दाखल केले. दरम्यान, प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी त्याची स्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगितले आणि पुढील उपचारासाठी तात्काळ मुंबईच्या रुग्णालयात नेण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vedanta Share: एका दिवसात Vedanta कंपनीचे शेअर्स तब्बल 62 टक्यांनी घसरले! नेमकं कारण काय?

DJ Noise Incident : लग्नाच्या वरातीतील डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा, १४० कोंबड्यांचा तडफडून मृत्यू

Latest Marathi News Live Update : पुण्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे आंदोलन

Congress MLC Candidate Maharashtra : तीन वाजेपर्यंत थांबा काँग्रेसचा उमेदवार समजेल, नाना पटोले स्पष्टच म्हणाले; उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवरही भाष्य

Bank News: कामाची बातमी! 1 मे ला बँका बंद की सुरू? RBI ची मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT