मुंबई

अभिनेते मुकुल देव यांचे निधन

CD

अभिनेते मुकुल देव यांचे निधन
मुंबई, ता. २४ : ‘सन ऑफ सरदार’, ‘आर... राजकुमार’, ‘जय हो’ यासारख्या लोकप्रिय चित्रपटांतून ओळख निर्माण करणारे अभिनेते मुकुल देव (वय ५४) यांचे आजारपणामुळे निधन झाले. गेल्या काही काळापासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांनी शनिवारी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे बॉलीवूडमध्ये शोककळा पसरली आहे.
मुकुल देव यांनी १९९६ मध्ये ‘मुमकिन’ या दूरदर्शनवरील मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यांनी हिंदीसह पंजाबी, बंगाली, मल्याळम, कन्नड आणि तेलुगू भाषांतील विविध ६० चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. अभिनयासोबतच त्यांनी काही प्रोजेक्ट्ससाठी लेखन आणि निर्मितीतही सहभाग घेतला होता.
चित्रपटांव्यतिरिक्त त्यांनी ‘२१ सरफरोश’ (२०१८) या टीव्ही मालिकेत गुल बादशाह आणि ‘स्टेट ऑफ सीज : २६/११’ (२०२०) या वेबसीरिजमध्येही महत्त्वाची भूमिका साकारली होती. २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अँट द एंड’ या हिंदी चित्रपटात ते शेवटचे झळकले होते. प्रसिद्ध अभिनेते राहुल देव यांचे ते बंधू होते. अभिनेत्री दीपशिखा नागपाल यांनी सोशल मीडियावर मुकुल यांच्या निधनाबाबत माहिती दिली. अनेक सेलिब्रिटींसह चाहत्यांनीही सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
--
फोटो - MUM25E91052

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs MI Live: पुण्याच्या पोराने कमाल केली! आधी अफलातून झेल टिपला, नंतर सूर्यकुमार यादवची विकेट घेत दिला तगडा झटका Video

Indapur Accident : इंदापूरमध्ये भरधाव कारचा थरार; झाडाखाली उभ्या तीन वाहनांना धडक

Akola Crime : ‘ऑपरेशन प्रहार’अंतर्गत अकोल्यात अवैध शस्त्रविक्रीवर धडक; ३ आरोपी अटकेत, २.२२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

पुण्यातील नवले पूलावर रास्तारोको; मोठी वाहतूक कोंडी, दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

Who is Ramakrishna Ghosh? नाशिकचा जन्म, पुण्यात गिरवले क्रिकेटचे धडे... CSK कडून आणखी एका महाराष्ट्रीय खेळाडूचे पदार्पण

SCROLL FOR NEXT