मुंबई

मुरबाडमध्ये अवकाळीमुळे ६१ घरांचे नुकसान

CD

मुरबाड, ता. २४ (वार्ताहर) : मुरबाड ग्रामीण भागात ६ मेपासून सतत अवकाळी पाऊस पडत आहे. या पावसामुळे तालुक्याला तिसऱ्यांदा जोरदार फटका बसला आहे. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात ४५ घरावरून छप्पर उडून नुकसान; तसेच दुसऱ्या टप्प्यात ३० घरांवरील पत्रे, कौले उडून नुकसान; तर तिसऱ्या टप्प्यात ६१ घरांवरील अंशत छप्पर/कौले/पत्रे उडून असे मिळून आतापर्यंत १३६ घरांचे नुकसान झाले आहे. याबाबतचा प्राथमिक अहवाल पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आलेला आहे.
जोरदार पावसामुळे २० मे रोजी सायंकाळी चार वाजता; तसेच रात्री सात वाजता आणि दहाच्या दरम्यान जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला. त्यामध्ये तालुक्यातील भादाने, भुवन सजा हद्दीतील शेलारी गाव यांच्यासह जवळपास ६१ घरांवरील अंशत पत्रे /कौले, छप्पर उडून नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानाची मुरबाड तहसील कार्यालयामार्फत तलाठी/सर्कल मंडळ, कर्मचाऱ्यांनी तत्काळ पंचनामे केले आहेत. अंदाजे चार लाखांपर्यंत नुकसान झाल्याची माहिती मुरबाड तहसीलदार अभिजित देशमुख यांनी दिली आहे.

शेलारी गावाला वादळी वाऱ्यासह पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. त्यामध्ये माझ्या घरावरील २५ पत्रे उडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सर्व नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी.
- पंढरीनाथ भोईर, शेतकरी शेजारी/मुरबाड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table मध्ये उलथापालथ; राजस्थानचा नेट रन रेट घसरला, CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळा

RR vs DC Live: 'चिमणी उडे, कावळा उडे'! पृथ्वी शॉ याच्यावर आली ही वेळ... सचिन, लारा यांच्यासोबत तुलना व्हायची आज तोच... Video

RR vs DC Live: रवींद्र जडेजाने 'बॅट'उगारली, कुलदीप यादवने दिला धक्का... नेमकं काय घडलं? Viral Video ची चर्चा...

Plane Crash: मोठा अपघात! हिल कंट्रीमध्ये विमान कोसळले; ५ जणांचा मृत्यू, कशी घडली घटना?

AIDS Report : सांगलीत संतापजनक प्रकार! मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी महिला गेली अन् एड्सचा पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाला; चुकीचा अहवाल दिल्याने डॉक्टरवर गुन्हा

SCROLL FOR NEXT