मुंबई

कब्रस्तानाच्या जागेवर धार्मिक कार्यक्रम

CD

खारघर, ता. २५ (बातमीदार) : खारघर सेक्टर १४ येथील कब्रस्तानासाठी दिलेल्या जागेचा वापर अवैधपणे मशीद व अन्य धार्मिक कार्यक्रमाकरिता केला जात असून, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. या अनधिकृत बांधकामावर तत्काळ कारवाई करण्यात यावी यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांची भेट घेऊन निवेदन दिले.
खारघर सेक्टर १४ येथे सिडकोने कब्रस्तानासाठी जागा राखीव ठेवली आहे. असे असतानासुद्धा या जागेचा वापर हा हेतुपुरस्सररित्या मशीद म्हणून केला जात असून, या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नमाज पठण व इतर धार्मिक कार्यक्रमाचे नियमितपणे आयोजन होत असल्याचे निदर्शनात आले आहे. हे अत्यंत चुकीचे व संतापजनक आहे. या प्रकारामुळे परिसरातील सामाजिक सलोखा धोक्यात आले असून, आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. या परिसरात मुस्लिम समाजाची लोकवस्ती नसतानादेखील मुद्दामून हेतुपूर्वक या सर्व गोष्टी केल्या जात आहेत, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, चिटणीस ब्रिजेश पटेल, खारघर शहराध्यक्ष प्रवीण पाटील, नितेश पाटील, विश्व हिंदू परिषदेचे प्रसन्ना धर्माधिकारी, कृष्णा बांदेकर, हिंदू जागरण मंचचे शिवम सिंग, ॲड. गायत्री खडवडकर, आदित्य कांबळे, शैलेंद्र त्रिपाठी आदी उपस्थित होते.
-----------------
कारवाई होत नसल्याने खेद
सेक्टर १४ मधील कब्रस्तानासाठी दिलेल्या जागेचा अवैधरित्या मशीद व धार्मिक कार्याकरिता वापर होत आहे. त्याबद्दल अन्य समाजात प्रचंड राग आहे व त्यासंदर्भात तेथील स्थानिक पदाधिकारी व नागरिकांना वारंवार पाठपुरावा करूनसुद्धा प्रशासनामार्फत अद्यापही कोणतीच कारवाई केली जात नाही, हे खेदजनक असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पोलिस आयुक्तांना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT