नवी मुंबई, ता. २५ (वार्ताहर) : रात्रीचे जेवण केल्यानंतर शतपावली करण्यासाठी मुलासोबत बाहेर पडलेल्या एका महिलेच्या गळ्यातील एक लाख चार हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या दोघा लुटारूंनी खेचून पलायन केले. ही घटना शुक्रवारी (ता. २३) रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास कोपरखैरणेत घडली. कोपरखैरणे पोलिसांनी या लुटारूंविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.
कोपरखैरणे सेक्टर १९ ए मध्ये राहणाऱ्या शांती दयाराम भानुशाली (५४) यांनी शुक्रवारी रात्री जेवण केल्यानंतर आपल्या मुलासह शतपावली करण्यासाठी गेल्या होत्या. दरम्यान, सेक्टर १९मधील वरिष्ठा चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोघा लुटारूंनी शांती भानुशाली यांच्या गळ्यातील एक लाख चार हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र खेचले. त्यानंतर त्या लुटारूंनी त्यांना धक्का देऊन पलायन केले. या प्रकारानंतर शांती भानुशाली यांच्या मुलाने लुटारूंचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला; मात्र दोघेही दुचाकीवरून पसार झाले. त्यानंतर शांती भानुशाली यांनी कोपरखैरणे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.