अंबरनाथ, ता. २५ (वार्ताहर) : अंबरनाथमध्ये संदलमध्ये फोडलेल्या फटाक्यामुळे एका महिलेचा डोळा निकामी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वूलन चाळ परिसरात घडलेल्या या घटनेप्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी संदलच्या आयोजकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
अंबरनाथमध्ये सध्या गैबनशाह वलीबाबांचा दहा दिवसांचा उरूस सुरू आहे. या निमित्ताने नेताजी मार्केट परिसरातील एकता मित्रमंडळाच्या वतीने शुक्रवारी (ता. २३) संदल म्हणजेच मिरवणूक काढण्यात आली होती. ही संदल वूलन चाळ परिसरातील मन्नत हॉटेलजवळ आली असता संदलमध्ये सहभागी असलेल्या एका तरुणाने फटाके लावले. त्याच वेळी मल्लम्मा रवी चलवादी (वय अंदाजे ४०) या दर्शनासाठी आल्या होत्या. दर्शन घेऊन त्या जात असताना यातील एक फटाका उडून त्यांच्या उजव्या डोळ्याला लागला. ही घटना उरुसाच्या आठव्या दिवशी म्हणजे शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली. यात त्यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत होऊन डोळा निकामी झाला आहे. दरम्यान, त्यांना तत्काळ अंबरनाथच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते; मात्र दुखापत गंभीर असल्याने त्यांना तातडीने मुंबईच्या जेजे हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी हलवण्यात आले. याप्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी संदलचे आयोजक एकता मित्रमंडळ आणि फटाका फोडणाऱ्या अज्ञात तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.