मुंबई

ठाण्यातील कांदळवने अतिक्रमणमुक्त

CD

ठाण्यातील कांदळवने अतिक्रमणमुक्त
वन विभागाचा धडक कारवाई
ठाणे शहर, ता. २५ (बातमीदार) : त्सुनामीसारख्या महासंकटाला थोपवून धरणाऱ्या कांदळवनावर झोपडपट्ट्या आणि इतर बांधकामांचे अतिक्रमण होत आहे. ठाणे परिसरात विशेषतः मुंब्रा, भोपर व नवघर या भागात कांदळवनांच्या जागांवर अतिक्रमण करून झोपडपट्ट्या व अनधिकृत बांधकामे उभारण्याचे प्रमाण वाढले आहे. याबाबत वाढत्या तक्रारींची दखल घेत कांदा वन विभागाने अतिक्रमित कांदळवनची जागा मोकळे करण्याचे काम हाती घेतले आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे वन विभागाने गेल्या चार महिन्यांत धडक कारवाई करत एकूण ०.४१ हेक्टर कांदळवनाचा भूभाग अतिक्रमणमुक्त केला आहे.

ठाणे, मुंबईसारख्या शहरी भागांमध्ये नागरीकरण आणि भूमाफियांकडून सुरू असलेल्या अतिक्रमणामुळे खाडीकिनारी असलेली कांदळवणे धोक्यात येत आहेत. याबाबत पर्यावरणप्रेमी नागरिकांच्या तक्रारीदेखील वाढल्या आहेत. या तक्रारांची दखल घेत ठाणे पूर्वेतील वन विभागाच्या कांदळवन विभागाने गेल्या चार महिन्यांत धडक कारवाई केली आहे. विभागीय वन अधिकारी दीपक खाडे, सहाय्यक वनसंरक्षक ज्ञानेश्वर राक्षे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंब्रा येथील सर्व्हे क्रमांक १६, १७, २० आणि २४ मध्ये मोठ्या प्रमाणावर झोपड्या उभारल्या गेल्या होत्या. येथे झालेल्या एप्रिल महिन्यातील कारवाईत सुमारे ४० ते ५० झोपड्या जमीनदोस्त केल्या असून, ०.२९ हेक्टर क्षेत्र पुन्हा मोकळे केले आहे, अशी माहिती कांदळवन परिक्षेत्र अधिकारी मनीष पवार यांनी दिली.

भोपर भागातील सर्व्हे क्र. २५२ (१ ते ४) येथे बांधण्यात आलेल्या २१ अनधिकृत कच्च्या व पक्क्या घरांवर जानेवारी महिन्यात कारवाई करण्यात आली. या मोहिमेद्वारे अंदाजे ०.०६ हेक्टर क्षेत्र अतिक्रमणमुक्त करण्यात आले. एप्रिल महिन्यात नवघरमधील सर्व्हे क्रमांक १५ मध्ये अतिक्रमण केलेल्या ८ ते १० झोपड्या तसेच राई येथील सर्व्हे क्रमांक १११ येथील जागेतील १० ते १२ झोपड्या निष्कासित केल्या आहेत. यामुळे ०.०६ हेक्टर क्षेत्र वन विभागाच्या ताब्यात आले आहे.

वन विभाग आता या मोकळ्या झालेल्या भूभागावर कांदळवन पुनर्रचना आणि वृक्षलागवड मोहीम राबवण्याची तयारी करत आहे. स्थानिक स्वयंसेवी संस्था, शाळा-महाविद्यालये, पर्यावरणप्रेमी नागरिकांना यामध्ये सहभागी करून घेतले जाणार आहे. या मोहिमेमुळे केवळ भूभागाचे संरक्षणच नव्हे, तर भविष्यातील पिढ्यांसाठी एक समृद्ध जैवविविधता व पर्यावरणीय सुरक्षा उभारण्याची दिशा मिळेल.
- मनीष पवार, वन परिक्षेत्र अधिकारी, ठाणे कांदळवन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : चार सामने अन् Orange Cap साठी ७ दावेदार! विराटचा शेवटचा क्रमांक, Vaibhav Sooryavanshi पण आहे पुढे, टॉपर कोण?

डोळ्यात संताप अन् लेकरासाठीची तगमग; प्रार्थना बेहेरेच्या 'मर्दिनी'चा टीझर प्रदर्शित; दिसणार अभिनेत्रीचा दमदार अंदाज

कला, नृत्य आणि विज्ञानाचा संगम... मुंबईत ओपन सायन्स पार्क साकारतंय! विज्ञान शिकणं होणार आणखी रंजक

Mhada Lottery: काही दिवस बाकी! म्हाडाच्या २,६४० घरांची लॉटरी, लगेचच करा अर्ज; कुठे आणि कसा? जाणून घ्या...

Nautapa 2026: नवतापा म्हणजे काय? वर्षातील सर्वात गरम दिवसांमागचं धार्मिक आणि वैज्ञानिक कारण जाणून घ्या

SCROLL FOR NEXT