भिवंडीत नालेसफाई अवघी ५० टक्के
भिवंडी, ता. २५ (वार्ताहर) : मागील १५ दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे. त्यातच भिवंडी पालिका क्षेत्रातील नालेसफाईची कामे उशिरा सुरू झाली. आता मॉन्सून महाराष्ट्राच्या वेशीवर आला असताना केवळ ५० टक्केच नालेसफाई झाली आहे. त्यामुळे येत्या पावसाळ्यात शहरातील असंख्य सखल भागात पाणी साचण्याची भीती नागरिकांकडून वर्तविली जात आहे. पालिका आयुक्त अनमोल सागर यांनी सुरुवातीलाच नालेसफाईची कामे गांभीर्याने करण्याचे आदेश दिले होते; मात्र पालिका प्रशासनातील काही अधिकारी याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे म्हटले जात आहे.
पावसाळापूर्व शहरातील नालेसफाई करण्याचा प्रघात आहे, जेणेकरून शहरातील सखल भागासह रस्त्यांवर पाणी साचू नये, यासाठी विशेष खर्च करून नालेसफाई केली जाते. यावर्षी पालिका क्षेत्रातील पाच प्रभाग समितीअंतर्गत ४४ हजार ५६५ मीटर लांबीचे १३५ नाले व मोठी गटारे यांच्या पावसाळापूर्व सफाईसाठी दोन कोटी २७ लाख ९७ हजार १३६ रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे.
यासाठी प्रभाग समितीनिहाय सहा ठेकेदार नेमले आहेत. या वेळी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नालेसफाईच्या कामास सुरुवात झाली, परंतु अवकाळी पावसाची संततधार व आता जूनपूर्वीच मौसमी पावसाचे आगमन होणार आहे. त्यामुळे या दरम्यानच्या काळात झालेली ५० टक्के नालेसफाई ही पैशांचा अपव्यय करणारी ठरणार आहे.
या भागात पूरस्थितीची भीती
शहरात देवाजी नगर, कमला हॉटेल, टोरंट कार्यालय मंगल भवन, कल्याण नाका, भादवड साईबाबा मंदिर, बाला कंपाउंड, कारिवली रोड ही रस्त्यावर पाणी साचणारी हमखास ठिकाणे आहेत, तर म्हाडा कॉलनी, इदगाह झोपडपट्टी, तांडेल मोहल्ला, बंदर मोहल्ला, छत्रपती शिवाजी महाराज चौक, नजराणा कंपाऊंड, देऊनगर, श्रीरंगनगर, पद्मानगर, समरु बाग, बाजारपेठ, मंडई, मंगल बाजार ही हमखास पाणी जमा होणारी नागरी वस्तीची ठिकाणे आहेत. या परिसरात नालेसफाईची कामे कमी झाल्याने या भागात पावसाळ्यात पाणी साचण्याने नागरिकांच्या चीज वस्तूंसह साहित्याचे नुकसान होणार आहे, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.