धारावीतील ९० फुटी रस्त्यावर कचऱ्याची दुर्गंधी
धारावी, ता. २५ (बातमीदार) : धारावीतील ९० फुटी रस्त्यावरील धारावी पोलिस ठाण्यासमोरील कचरा कुंडीची बिकट अवस्था झाली आहे. कचरा कुंडीतील सर्व कचरा रस्त्यावर पसरला आहे. त्यामुळे विभागात दुर्गंधी पसरली आहे. लगतचे कोंबडीचे मटण विकणारे दुकानदार कापलेल्या कोंबडीचे खराब उरलेले मटण, आतडे गोणीमध्ये भरून इथेच फेकतात. त्या गोणीमधील चिकनचा कचरा उंदीर, कावळे, कुत्रे पूर्ण रस्त्यावर पसरवतात. त्यामुळे दुर्गंधी पसरत असल्याची तक्रार स्थानिक रहिवासी राज साळुंके यांनी केली आहे. पालिकेने यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी साळुंके यांनी केली आहे.
सध्या मुंबईत अवकाळी पाऊस कोसळत आहे. त्यामुळे रस्त्यावर पडलेला कचरा कुजून दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे रोगराई पसरण्याची भीती स्थानिक व्यक्त करत आहेत. याकडे पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.