आयआरसीटीसीच्या मुंबईहून परदेश सहली
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, २५ : इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडकडून (आयआरसीटीसी) मुंबईकरांसाठी थेट परदेशवारीची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. आयआरसीटीसीने युरोपसह लंडन, श्रीलंका, बाली आणि नेपाळसारख्या देशांमध्ये जाणारी किफायतशीर आणि सर्वसमावेशक आंतरराष्ट्रीय टूर पॅकेजेस सादर केली असून, ती मध्यमवर्गीय प्रवाशांच्या आवाक्यातील आहेत.
पश्चिम विभागाचे ग्रुप जनरल मॅनेजर गौरव झा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही पॅकेजेस केवळ स्वस्तच नाहीत, तर त्यामध्ये प्रवाशांना दर्जेदार सेवा, चांगला अनुभव आणि आजीवन लक्षात राहणाऱ्या आठवणी मिळणार आहेत. या सर्व टूर पॅकेजेसमध्ये विमानप्रवास, निवास, जेवण, प्रवेश शुल्क, व्हिसा/परमिट, टूर गाईड, प्रवास विमा आणि जीएसटीचा समावेश असून, पर्यटकांना स्वतंत्रपणे काहीच खर्च करावा लागणार नाही. प्रमुख पॅकेजेसमध्ये ‘युरोप विथ लंडन’ (२६ जून ते १० जुलै २०२५), ‘श्रीरामायण यात्रा-श्रीलंका’ (१६ ते २२ जून २०२५), ‘अमेझिंग बाली’ (१४ ते १९ जुलै २०२५) आणि ‘नेपाळ दर्शन’ (१२ व १७ ऑगस्ट २०२५) यांचा समावेश आहे. ही पॅकेजेस इतर प्रवासी कंपन्यांच्या तुलनेत अधिक स्पर्धात्मक दरात असून, ग्राहकांना ‘वॅल्यू फॉर मनी’ अनुभव देणार आहेत. आयआरसीटीसीच्या www.irctctourism.com या अधिकृत संकेतस्थळावर ही पॅकेजेस ‘फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्ह’ या तत्त्वावर बुकिंगसाठी उपलब्ध असून, प्रवाशांनी लवकरात लवकर बुकिंग करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.