श्रीमलंगगडावर धुक्याची छाया
रविवारचा मुहूर्त साधत पर्यटकांनी लुटला सुट्टीचा आनंद
कल्याण, ता. २५ : मे महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू असताना अवकाळी पावसामुळे जणू मॉन्सूनच सुरू झाल्याचा अनुभव येत आहे. उन्हाळ्यात पावसाच्या या खेळात कल्याण व आसपासच्या भागात रविवारी संपूर्ण दिवसभर भुरभुरीसह धुक्याचे वातावरण पाहायला मिळाले. विशेषतः श्रीमलंगगड धोक्याच्या छायेखाली गेल्याचे दिसले. त्यामुळे निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी रविवारच्या सुट्टीचा मुहूर्त साधत अनेक पर्यटकांची पावले श्रीमलंगगडाकडे वळली.
श्री मलंगगड हा अंबरनाथ तालुक्यातील किल्ला असून, कल्याण-डोंबिवली आणि आसपासच्या शहरी भागातील लोकांना पर्यटनासाठी अत्यंत जवळचा व सोयीस्कर असा पर्याय आहे. विशेषतः पावसाळ्यात येथील वातावरण आल्हाददायक असल्याने शहरातील असंख्य लोक या ठिकाणी निवांत व मोकळा श्वास घेण्यासाठी गर्दी करतात. सध्या मे महिन्यातच पावसाने हजेरी लावल्याने पावसाळ्यापूर्वीच श्री मलंगगड बहरू लागला आहे. प्रचंड गर्मीचा महिना अशी मे महिन्याची ओळख असली तरी मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी मात्र उन्हाळा जाणवला नाही.
दर अर्ध्या तासाने बससेवा
कल्याणपासून श्री मलंगगडला जाण्यासाठी केडीएमटी बस दर अर्ध्या-एका तासाने धाव घेतात. हे अंतर जवळपास १६ किमी असून पाऊण तासांचा प्रवास करून बस श्री मलंगगडाच्या पायथ्याशी पोहोचते. यानंतर श्री मलंगगड पायी चढून वर यायला सुमारे पाऊण ते एक तास आणखीन लागतो; मात्र अलीकडच्या काळात श्री मलंगगडावर ‘फ्युनिक्युलर रोपवे’ची सुविधा उपलब्ध असल्याने अवघ्या पाच ते १० मिनिटांत रोपवेची सैर करीत किल्ल्यावर पोहोचता येते. पावसाळ्याला आणखी अवकाश असला तरी अवकाळी पावसाने बनविलेले वातावरणच पर्यटकांना श्री मलंगगडाकडे येण्यासाठी भुरळ घालत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.