मुंबई

‘वंदे भारत’, ‘वलसाड-दाहोद’ २७ मेपासून धावणार

CD

‘वंदे भारत’, ‘वलसाड-दाहोद’ २७ मेपासून धावणार
पंतप्रधानांच्या हस्ते उद्‍घाटन

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ :  पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी साबरमती-वेरावल वंदे भारत एक्स्प्रेस आणि वलसाड-दाहोद एक्स्प्रेस या दोन महत्त्वाच्या गाड्या २७ मे २०२५ पासून नियमितपणे धावणार आहेत. या दोन्ही सेवांचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ मे रोजी दाहोद येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवून करणार आहेत.
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक २६९०१/०२ वंदे भारत एक्स्प्रेस साबरमती ते वेरावल मार्गावर गुरुवार वगळता दररोज धावेल. ट्रेन  क्र. २६९०१ ही साबरमतीहून सकाळी ५.२५ वातजा सुटून दुपारी १२.२५ वाजता वेरावलला पोहोचेल. त्याचप्रमाणे ट्रेन क्र. २६९०२ वेरावलहून दुपारी २.४० वाजता सुटून रात्री ९.३५ वाजता साबरमतीला पोहोचेल. या गाडीत एसी चेअर कार व एक्झिक्युटिव्ह चेअर कारचा समावेश आहे. दुसरीकडे वलसाड-दाहोद मार्गावर नवीन एक्स्प्रेस सेवा सुरू होत असून, उद्घाटन विशेष गाडी क्र. ०९०११ वलसाडहून २६ मे रोजी सकाळी ११.३० वाजता सुटून संध्याकाळी ५.२५ वाजता दाहोदला पोहोचेल. या गाडीत एसी चेअर कार, सेकंड क्लास सिटिंग आणि जनरल कोच असतील. ट्रेन क्रमांक १९०११/१२ वलसाड-दाहोद एक्स्प्रेसची नियमित सेवा २७ मेपासून सुरू होईल. वलसाडहून पहाटे ५.१५ वाजता सुटून गाडी सकाळी ११.०५ वाजता दाहोदला पोहोचेल. परतीची गाडी दाहोदहून ११.५५ वाजता सुटून रात्री ८.०५ वाजता वलसाडला पोहोचेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhishek Banerjee Attacked : पश्चिम बंगालमध्ये खळबळ! TMC खासदार अभिषेक बॅनर्जींवर थेट जमावाकडून हल्ला; 'चोर चोर'च्या घोषणा देत बेदम मारहाण, अंडी-दगडंही फेकली

Mumbai Crime: पुण्यातील विषारी दारुचे धागेदोरे भिवंडीत, तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई; नेमकं काय घडलं?

IPL फायनलपूर्वी RCB चाहत्यांना मोठा धक्का! सेलिब्रेशनवर पोलिसांकडून बंदी; मोठी अ‍ॅडव्हायजरी जारी

Relationship Tips : जोडीदाराने नेहमी तुम्हाला जास्त प्रायोरिटी द्यावी असं वाटतं ना? मग नात्यात अजिबात करू नका 'या' 3 चुका

Mumbai: मुंबईकरांना मोठा दिलासा! मेट्रो, मोनोरेल आणि लोकल रेल्वेचा संगम... 'हे' स्टेशन वन-स्टॉप कनेक्टिव्हिटी हब बनणार

SCROLL FOR NEXT