मुंबई

उलवेतील विवाहितेच्या हत्या प्रकरणातील आरोपी गजाआड

CD

उलवेतील विवाहितेच्या हत्या प्रकरणातील आरोपी गजाआड
उत्तर प्रदेशमधील नोएडा येथून पोलिसांची धरपकड
नवी मुंबई, ता. २५ (वार्ताहर) : उलवेतील २७ वर्षीय विवाहितेच्या हत्या प्रकरणातील फरार असलेल्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी गजाआड केले आहे. सुखबीर निर्मलसिंग राठिया ( वय २४) व गुरुप्रीत अवतार सिंग ( वय २५) अशी या आरोपींची नावे आहेत. गुन्हे शाखेच्या पथकाने या दोघांना उत्तर प्रदेशमधील नोएडा येथून ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांना लवरकच नवी मुंबईत आणले जाणार आहे. चार दिवसांपूर्वी पोलिसांनी या हत्या प्रकरणातील मृत विवाहितेचा पती व त्याच्याकडून हत्येची सुपारी घेणाऱ्या दोन महिलांना अटक केली आहे.
उलवे सेक्टर ५ मध्ये राहणाऱ्या अलविना अदमली खान (वय २७) या विवाहितेची गत रविवारी मध्यरात्री भररस्त्यात गळा चिरून हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणाचा उलवे पोलिस आणि गुन्हे शाखेने तपास केला असता, मृत अलविना व तिचा पती किशोरसिंग राजपूत या दोघांमध्ये आर्थिक देवाण-घेवाणीतून तसेच घटस्फोट घेण्यावरून वाद झाल्याचे आढळून आले. त्यानुसार पोलिसांनी किशोरसिंग याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केल्यानंतर त्याने अलविनाची हत्या घडवून आणण्यासाठी उलवेत राहणाऱ्या अलिशा त्यागी हिला सहा लाखांची सुपारी दिल्याचे उघडकीस आले.
तसेच अलिशा त्यागी व डिंपल या दोघींनी पंजाब येथून सुखबीर राठिया व गुरुप्रीत सिंग या दोघांना अलविनाची हत्या करण्यास सांगितले होते. त्यानुसार सुखबीर व गुरुप्रीत या दोघांनी गत रविवारी दुचाकीवरून अलविनावर पाळत ठेवली होती. रात्री १२ वाजण्याच्या सुमारास अलविना आपल्या घरी पायी चालत जात असताना, सुखबीर याने अलविनाचा गळा चिरला होता. त्यानंतर दोघा मारेकऱ्यांनी दुचाकीवरून तेथून पलायन केले होते. त्यानंतर पोलिसांनी किशोरसिंग राजपूत, अलिशा त्यागी व डिंपल या तिघांना अटक केली होती, मात्र अलविनाची हत्या करणारे दोघे मारेकरी फरार झाले होते. त्यामुळे गुन्हे शाखा व उलवे पोलिसांकडून या मारेकऱ्यांचा शोध घेण्यात येत होता.
....................
या हत्या प्रकरणातील दोघे मारेकरी उत्तर प्रदेशमधील नेएडा येथे असल्याची माहिती उलवे पोलिसांना मिळाली होती. त्‍यानंतर उलवे पोलिस आणि गुन्हे शाखा युनिट-२ मधील पोलिस उपनिरीक्षक अभय शिंदे व संतोष पिलाणे यांचे संयुक्त पथक शनिवारी नोएडा येथे रवाना करण्यात आले होते. त्यानंतर या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने सुखबीर राठिया व गुरुप्रीत सिंग या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी नोएडा गोतम नगर येथील न्यायालयाकडून ट्रान्झिट रिमांड मिळवून दोन्ही आरोपींना घेऊन ते नवी मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त अजयकुमार लांडगे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Corporators Not Reachable : विधानपरिषदेचे राजकारण तापलं! काँग्रेसचे ५० ते ६० नगरसेवक नॉट रीचेबल, भाजप आमदाराचा दावा

12 Years of PM Modi नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली तेव्हा पेट्रोल-डिझेलचे दर किती होते?

Blood Group Stroke Risk: ‘या’ रक्तगटाच्या लोकांना स्ट्रोकचा जास्त धोका? वाचा शास्त्रज्ञांचं नेमकं म्हणणं काय

Ganga Dussehra: वर्षातून एकदा होतो गंगा आणि नर्मदेचा संगम! काय आहे 'भयडा प्रसाद' आणि त्याची रेसिपी?

Mumbai: महापालिका जागा सील करू शकत नाही, थकीत मालमत्ता कर वसूलीवर न्यायालयाचा निर्वाळा

SCROLL FOR NEXT