मुंबई

१५ वर्षीय मुलीचे अपहरण करत लैंगिक अत्याचार

CD

१५ वर्षीय मुलीचे अपहरण करीत लैंगिक अत्याचार
- दोन महिन्यांनी पीडित मुलीची पोलिसांकडून सुटका

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २५ : एक १५ वर्षीय मुलीचे मसाला विक्रेत्याने अपहरण करीत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपीने ही मुलगी गर्भवती राहिल्यानंतर तिचा गर्भपात करून तिला एका दाम्पत्याकडे ठेवले. त्यांनी तिच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला. याप्रकरणी पोलिसांनी या दाम्पत्याच्या घरी छापा टाकत पीडितेची सुटका केली. याप्रकरणी एका महिलेसह तिचा पती, दोन पुरुष अशी चार जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टिळकनगर पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार पीडित मुलगी आपल्या आई व बहिणींसह डोंबिवलीजवळील ग्रामीण परिसरात राहते. तिच्या आईचा खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय आहे. याच व्यवसायातून आशुतोष राजपूत या तरुणाचे त्यांच्या घरी येणे-जाणे होते. आशुतोष याचा मसाले विक्रीचा व्यवसाय आहे. यातून झालेल्या ओळखीचा फायदा घेत आशुतोषने पीडित मुलीशी ओळख वाढवली. या मुलीने दहावीची परीक्षा दिल्यानंतर तिचे आणि तिच्या आईचे भांडण झाले. त्यामुळे रागावलेल्या पीडितेने आशुतोषशी संपर्क साधला आणि त्याच्या घरी गेली. या संधीचा आशुतोषने फायदा घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. मुलगी घरी परतली नाही म्हणून आईने तिचा शोध घेतला. यादरम्यान आशुतोष तुमच्या मुलीला आज या ठिकाणी बघितले, त्या ठिकाणी बघितले असे सांगून मुलगी शहरातच आहे, असे तिच्या आईला सांगत होता. मुलगी रागावलेली असल्याने ती परत येईल, या आशेने पीडितेची आई आशुतोषवर विश्वास ठेवत होती; मात्र दोन महिन्यांपासून मुलगी घरीच न आल्याने तिला संशय आला. तिने याप्रकरणी टिळकनगर पोलिस ठाण्यात मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल करीत मुलीचा शोध सुरू केला. याचदरम्यान ही मुलगी डोंबिवलीजवळील ग्रामीण भागात एका घरात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकत पीडित मुलीची सुटका केली. पीडित मुलीने केलेल्या खुलाशानंतर पोलिसांनी तपासाची चक्री फिरवली. मुस्कान शेख, तिचा नवरा यांच्यासह दोन जणांना अटक केली.


पोलिस चौकशीत आरोपी आशुतोषने मुलीचे अपहरण करीत तिला एका खोलीत डांबून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यातून पीडित मुलगी गर्भवती राहिली असता तिचा एका दुसऱ्या महिलेच्या घरी नेऊन गर्भपात केला. त्यानंतर पुन्हा काही जणांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. नंतर त्या ठिकाणाहून या मुलीला मुस्कान नावाच्या एका महिलेच्या घरी डांबून ठेवण्यात आले. तिथे या पीडितेला वेश्याव्यवसायात ढकलत तिच्यावर लैंगिक अत्याचार सुरूच असल्याचे समोर आले. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करीत असून, आशुतोष याचा शोध घेतला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: महायुतीत अंतर्गत कलह उफाळला! शिंदे सेनेत बंडाची चाहूल; वाढत्या असंतोषामुळे नेते भाजपच्या वाटेवर?

Rain Alert: संभाजीनगरात अवकाळी वादळाचा तडाखा! पावसासह वादळी वाऱ्यांचा कहर; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Latest Marathi News Live Update : अकोल्यातल्या दहीहंडामध्ये कडाक्याच्या उष्णतेनंतर पावसाची हजेरी

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! कोटपा कायदा अधिक कठोर करणार; तंबाखू विक्री आणि प्रचारावर कडक नियंत्रण येणार

Video: मला टी२० मध्ये २०० धावा करायच्यात...' वैभव सूर्यवंशीने पीटरसनसमोरच थेट सांगितलं; गेलच्या विक्रम मोडायचीही भाषा

SCROLL FOR NEXT