मुंबई

बनावट पिस्तुलाचा धाक दाखवत लुटीचा प्रयत्न

CD

बनावट पिस्तुलाचा धाक दाखवत लुटीचा प्रयत्न
घटना सीसीटीव्हीत कैद; दोघे ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २५ : कारखान्यात शिरून बनावट पिस्तुलाचा धाक दाखवून खंडणी मागणीचा प्रकार उघडकीस आला आहे. या वेळी प्रसंगावधान राखत कारखाना मालका मोहम्मद शब्बीर शेख यांनी आरोपींना कारखान्यात ढकलून बंद केले. त्यानंतर तात्काळ या घटनेची माहिती फोन करून पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघाना ताब्यात घेतले. ही घटना कल्याण पूर्वेतील काटेमानिवली भागात शनिवारी (ता.२४) दुपारी घडली. हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून, आरोपींकडील पिस्तूल बनावट असल्याचे उघड झाले आहे.

काटेमानिवली परिसरात मोहम्मद शब्बीर शेख (वय ४१) हे त्यांचा भाऊ व वहिनीसह प्रभात चाळ भागात हँडवर्कचा कारखाना चालवतात. या कारखान्यात शनिवारी दुपारी २ ते ३ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या ओळखीचा सुभान पठाण हा तरुण येऊन पैशांची मागणी करीत होता. काही वेळातच त्याने पिस्तूल दाखवत धमकी देत पैशांची मागणी केली. त्यानंतर त्याचा साथीदार सिद्धार्थ अहिरे याच्यासह परत येऊन दोघांनी मिळून पुन्हा एक हजार रुपयांची मागणी केली. शेख यांनी प्रसंगावधान राखत सुभान पठाणला ढकलून देत कारखान्यात दोघांना बंद केले आणि त्वरित पोलिस कंट्रोल रूमला माहिती दिली. कोळसेवाडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून दोघांना अटक केली. तपासादरम्यान आरोपीजवळील पिस्तूल नकली असल्याचे उघड झाले आहे. कोळसेवाडी पोलिसांनी सुभान पठाण व सिद्धार्थ अहिरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सुनावणीला वेग; आरोपीचा शोध घेणाऱ्या दोन महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंद

SCROLL FOR NEXT