पावसाळ्यात वीज यंत्रणेपासून सतर्क राहा
महावितरणचे नागरिकांना आवाहन; विभागाकडून नियंत्रण कक्षाची स्थापना
वसई, ता. २६ (बातमीदार) ः वादळी व संततधार पाऊस किंवा अतिवृष्टी, पूरस्थिती, झाडे व फांद्या कोसळल्याने तुटलेल्या वीजतारा, विजेची उपकरणे किंवा यंत्रणेमध्ये शॉर्टसर्किटमुळे वीज अपघाताची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे, यासाठी महावितरणकडून आवाहन करण्यात आले आहे. तसेच विभागाकडून पालघर जिल्ह्यात नियंत्रण कक्ष उभारण्यात आले आहेत.
अतिवृष्टी, वादळी पावसामुळे तुटलेल्या वीजतारा, वीजखांब, रस्त्याच्या बाजूने फिडर पिलर, रोहित्राचे लोखंडी कुंपण, फ्यूज बॉक्स तसेच घरातील ओलसर विद्युत उपकरणे, शेतीपंपाचे स्विच बोर्ड, विद्युत यंत्रणा जवळील इतर ओलसर वस्तु, साहित्य आदींमुळे विद्युत अपघात होण्याची शक्यता असते. तसेच झाडे व फांद्या वीज तारांवर पडतात. वीजप्रवाह असण्याची शक्यता असल्याने, त्यापासून सावध राहावे. या वीजतारांना हात लावण्याचा किंवा हटविण्याचा प्रयत्न करू नये. असे प्रकार आढळल्यास तातडीने महावितरणशी संपर्क साधावा, असे आवाहनदेखील महावितरण विभागाने केले आहे.
फ्यूज तार म्हणून तांब्याऐवजी ॲल्युमिनियम अलॉय ही विशिष्ट धातुची तार वापरावी. विजेवर चालणारे सर्व उपकरणे नेहमी स्वीचबोर्डपासून बंद करावित. विशेषत ग्रामीण भागात विजेच्या खांबाला जनावरे बांधू नयेत. विजेचे खांब किंवा तारांजवळ कपडे वाळत घालू नयेत, अशा सूचना पालघरमधील नागरिकांना मावितरण विभागाकडून करण्यात आल्या आहेत.
---------------
जिल्हा नियंत्रण कक्ष
वसई मंडलासाठी (वसई, विरार, नालासोपारा, आचोळे, वाडा) ७८७५७६०६०२, पालघर मंडलासाठी (बोईसर, डहाणू, जव्हार, पालघर, मोखाडा, सफाळा, तलासरी, विक्रमगड) ९०२८१५४२७८ हे नियंत्रण कक्षाचे क्रमांक ग्राहकांच्या तक्रारी व धोक्यांची सूचना देण्यासाठी उपलब्ध करण्यात आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.