मुंबई

वाहनचोरीच्या नऊ गुन्ह्यांची उकल

CD

भिवंडी, ता. २७ (वार्ताहर)ः वाहनचोरीत सराईत अक्षय वर्मा ऊर्फ शिवाला भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून सहा दुचाकी तीन महागडे मोबाईल असा एकूण तीन लाख ४८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नारपोली पोलिस ठाणे येथे दाखल वाहनचोरीच्या गुन्ह्याचा समांतर तपास भिवंडी गुन्हे शाखेकडून सुरू होती. या वेळी पोलिस हवालदार नीलेश बोरसे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलिस निरीक्षक श्रीराज माळी, धनराज केदार, पोलिस उपनिरीक्षक रवींद्र पाटील, पोलिस कर्मचारी प्रशांत राणे, किशोर थोरात, सचिन जाधव, सुदेश घाग, शशिकांत यादव, अमोल इंगळे, उमेश ठाकूर, भावेश घरत, विजय कुंभार यांच्या पथकाने रेकॉर्डवरील आरोपी अक्षय वर्मा ऊर्फ शिवाला ताब्यात घेतले होते. त्याने नारपोली येथील वाहनचोरीची कबुली दिली. तसेच कापूरबावडी, कासारवडवली, शांतिनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरलेल्या सहा दुचाकी जप्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Voting Scam Controversy : आयोगाच्या मदतीने मतांची चोरी : तेजस्वी यादव

Latest Marathi News Updates : पुण्यातील गणपती विसर्जनावरुन वाद, गणेश मंडाळाची पत्रकार परिषद

Arjun Tendulkar : कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक आहे अर्जुन, कशी होते कमाई?

Chhagan Bhujbal : पालकमंत्रिपदाच्या वादाला तोंड फुटले; छगन भुजबळांनी गोंदियातील ध्वजारोहणास दिला नकार

Independence Day 2025 Marathi Wishes: विजयी विश्वतिरंगा प्यारा...स्वातंत्र्य दिनानिमित्त मित्रपरिवाराला पाठवा देशभक्तीभर शुभेच्छा

SCROLL FOR NEXT