किन्हवली (बातमीदार)ः महसूल व सामान्य प्रशासनाच्या आदेशाला अधीन राहून पोलिस, नागरिकांमध्ये महत्त्वाचा दुवा म्हणून पोलिस पाटलांची ओळख असते. अशा सेवानिवृत्त पोलिस पाटलांचा सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या ‘संवेदना’ प्रतिष्ठानने सन्मान केला. किन्हवली पोलिस स्टेशनअंतर्गत हा उपक्रम करण्यात आला. या कार्यक्रमासाठी किन्हवली पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन खैरनार, सामाजिक कार्यकर्ते किसन बोंद्रे, पंचायत समितीचे माजी उपसभापती सुभाष हरड, वसंत गगे, प्रकाश सपाट आणि ग्राम महसूल अधिकारी उपस्थित होते. संवेदना प्रतिष्ठानचे संस्थापक पोलिस पाटील संजय गगे, अध्यक्ष राजेश ढमके यांच्यासह संवेदना परिवाराने मेहनत घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.