सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २७ : डोंबिवली पश्चिम येथील एव्हरेस्ट हाउस ही इमारत अतिधोकादायक म्हणून घोषित केली आहे. विकसकाच्या हट्टापायी इमारत धोकादायक दाखवून तेथे राहत असलेल्या जोशी कुटुंबीयांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न प्रशासन व विकसकांनी केल्याचा आरोप मनसेने केला आहे. जोशी कुटुंबाला न्याय मिळाला नाही तर आंदोलन करू, असा इशाराही मनसेने दिला आहे. शनिवारी (ता. २४) मनसेच्या शिष्टमंडळाने जोशी कुटुंबाची भेट घेतली.
डोंबिवली पश्चिम येथील एव्हरेस्ट हाउस ही इमारत प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांच्या माध्यमातून अतिधोकादायक म्हणून घोषित केली, परंतु या इमारतीवरील मिळकत क्रमांक चुकीचा असल्याचे निदर्शनास आले. विकसकाच्या हट्टापायी इमारत धोकादायक करून इमारतीमधील जोशी कुटुंबीयांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न केला आहे, असे मनसेने म्हटले आहे. महापालिकेने केलेली चूक मनसेने लक्षात आणून देताचा मूळ इमारतीच्या मालमत्ता क्रमांकानुसार जोशी कुटुंबीयांना भोगवटा प्रमाणपत्र दिले. दरम्यान, ही इमारत तुटत असल्याकारणाने जोशी कुटुंबीयांना विकसक आणि जोशी कुटुंबीय यांच्यामधील पुनर्विकास करार होणे अपेक्षित आहे. जोशी कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी वेळ पडल्यास रस्त्यावर उतरू, असा इशारा मनसेचे शहराध्यक्ष कामत यांनी दिला. याप्रसंगी अनेक वर्षे कसा त्रास दिला याचा पाढाच जोशी कुटुंबीयांनी वाचला.
याप्रसंगी संपूर्ण जोशी कुटुंबीय मनसेचे शहराध्यक्ष राहुल कामत, विधानसभा सचिव अरुण जांभळे, उप शहराध्यक्ष योगेश म्हात्रे विभागाध्यक्ष रितेश म्हात्रे, शशिकांत कोकाटे, जनहित कक्षाचे शहराध्यक्ष सागर मुळे, राजेश लिंगायत, भाग्येश इनामदार, परेश बडवे व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.