मुंबई

सीएनजीसाठी चालकांची झोपमोड

CD

मुरबाड, ता. २७ (बातमीदार)ः तालुक्यात वाहनांच्या तुलनेत होणारा सीएनजीचा पुरवठा अपुरा आहे. अशातच शहरात एकच पंप असल्याने पहाटेपासून रांगा लावण्याची वेळ आल्याने चालक-मालकांना झोपमोड करावी लागत आहे.
मुरबाड शहरात सोनार पाडा व माळशेज घाट रस्त्यावरील सारिका हॉटेलजवळील पेट्रोलपंप येथे सीएनजी गॅस उपलब्ध होता. त्यापैकी सारिका हॉटेलजवळील पेट्रोलपंप बंद झाल्याने आता केवळ सोनार पाडा येथील पेट्रोलपंपावर गॅस उपलब्ध होतो. तेथे दररोज एक टँकर भरून गॅस आणला जातो. सकाळी ७ वाजता वाहनामध्ये गॅस भरण्याचे काम सुरू होते, पण दुपारी गॅस संपत असल्याने अनेकांना २५ किलोमीटरचे अंतरावरील बदलापूर, कांबा, कोलम किंवा गोवेली येथे जावे लागते, पण यासाठी लागणारा वेळ आणि होणाऱ्या खर्चामुळे वाहनचालकांना भुर्दंड पडत आहे. त्यामुळे मुरबाड शहरात ऑनलाइन सीएनजी गॅसपुरवठा करणारा पंप सुरू करण्यात यावा तसेच ग्रामीण भागात नवीन गॅस पंप सुरू करावा, अशी मागणी होत आहे.
----------------------------------------
मुरबाड शहरात गॅसवर चालणाऱ्या रिक्षा, कारची संख्या अधिक आहे. रिक्षावाल्यांना दररोज गॅस भरावा लागतो. त्यासाठी पहाटे लवकर उठून रांगेत थांबावे लागते अन्यथा गॅस मिळत नाही. त्यामुळे आणखी एखादा पेट्रोलपंप तालुक्यात सुरू करण्याची गरज आहे.
- सतीश पोद्दार, वाहनमालक, मुरबाड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT