मुंबई

गुजरातच्या तस्कराकडून आठ किलो गांजा जप्त

CD

गुजरातच्या तस्कराकडून आठ किलो गांजा जप्त
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २७ : कल्याण रेल्वेस्थानकात प्रवासी म्हणून आलेला एक व्यक्ती कोणत्याही मेल एक्स्प्रेसमध्ये चढत नसल्याने रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांना त्याचा संशय आला. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याच्याकडे आठ किलो वजनाचा गांजासदृश अमली पदार्थ आढळून आला. नरेशकुमार मनोहरभाई पंचोली (वय ३४) याला पोलिसांनी त्याला ताब्यात घेत अटक केली असून, अधिक तपास सुरू आहे.

कल्याण रेल्वेस्थानकातील फलाट क्रमांक सातवरून लांब पल्ल्याच्या मेल, एक्स्प्रेस सुटतात. या लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून देशाच्या विविध भागातून प्रवासी येतात. त्यामुळे कल्याण रेल्वेस्थानकातील फलाट पाच ते सातवर सुरक्षा बलाचे पोलिस सतत तैनात असतात. सोमवारी दुपारी रेल्वे सुरक्षा बलाचे जवान नेहमीप्रमाणे कल्याण रेल्वेस्थानकातील फलाट क्रमांक सातवर तैनात होते. या फलाटावर एक व्यक्ती प्रवासी म्हणून फिरत असल्याचे दिसले. तो प्रवासी फलाटावर येणाऱ्या कोणत्याही मेल किंवा एक्स्प्रेसमध्ये चढत नव्हता. हा प्रवासी कोठेही जात नाही. तो बराच उशीर फलाटावर रेंगाळत असल्याने लोहमार्ग पोलिस आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांना संशय आला. त्याच्याजवळ प्रवासी वाहतुकीची मोठी पिवशी होती. हा प्रवासी संशयास्पद वाटत असल्याने जवानांनी त्याच्यावर पाळत ठेवली. त्याची तपासणी करण्याचे जवानांनी ठरवले. एक जवान फलाट क्रमांक सातवर घुटमळणाऱ्या प्रवाशाजवळ गेला. त्याच्याजवळ जात जवानाने त्याची चौकशी केली असता हा व्यक्ती गोंधळून गेला. तो पोलिसांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देऊ शकला नाही. त्याला ताब्यात घेत त्याची पाहणी केली असता त्याच्याजवळ अमली पदार्थ आढळून आले.

नरेशकुमार मनोहरभाई पंचोली (वय ३४) असे त्याचे नाव असून, तो गुजरात येथे राहणारा आहे. त्याच्याजवळ पोलिसांना आठ किलो वजनाचा गांजा आढळून आला. पोलिसांनी त्याच्या विरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याने गुन्हा नोंदवून अटक केली. सदर कारवाई लोहमार्ग पोलिस ठाण्याचे पोलिस उपायुक्त मनोज पाटील, सहाय्यक पोलिस आयुक्त अरूण पोखरकर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण लोहमार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरी कांदे, पोलिस निरीक्षक लक्ष्मण चव्हाण, उपनिरीक्षक प्रमोद जगताप, रेल्वे सुरक्षा बळाचे वरिष्ठ निरीक्षक गौरीशंंकर एडले, सहाय्यक उपनिरीक्षक विजय पाटील आणि पथकाने केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai port oil tanker arrival: होर्मुझचा धोकादायक मार्ग पार करत पहिले तेलवाहू जहाज मुंबई बंदरात दाखल! व्हिडिओ पाहा...

Maharashtra Heatwave : विदर्भात उष्णतेची लाट ! अमरावतीत देशातील सर्वाधिक तापमान, मात्र राज्यातील 'या' जिल्ह्यांत अवकाळीचा इशारा

Solapur Water Crisis: सोलापूर शहरात आता चार अन् पाच दिवसांआड पाणी; तीन दिवसांआडची पद्धत बंद, जलवाहिनी नसलेल्या ठिकाणी टँकरने पुरवठा!

Nanded News: नांदेडमध्ये गॅस एजन्सीसमोर पहाटेपासून रांगा; घरगुती सिलिंडरवर व्यावसायिकांची नजर; घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर वाढला

Latest Marathi News Live Update : आंतरराष्ट्रीय शांतता दिनानिमित्त पुण्यात आज मुस्लिम समाज काढणार शांतता मोर्चा

SCROLL FOR NEXT