मुंबई

कासातील वीज वितरण कार्यालय स्थलांतरित

CD

कासातील वीज वितरण कार्यालय स्थलांतरित
कासा, ता. २७ (बातमीदार) : तीन दशकांहून अधिक काळ कार्यरत असलेले कासा येथील शाखा अभियंता वीज वितरण कार्यालय सध्या स्थलांतरित करण्यात आले आहे. कासा येथील जुनी इमारत धोकादायक स्थितीत असल्याने ती पाडण्यात आली. त्यामुळे काही काळ कार्यालय चारोटी येथे स्थलांतरित केले होते. दरम्यान, अलीकडेच हे कार्यालय सूर्यानगर उपकेंद्रातील इमारतीत स्थलांतरित केले आहे. यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे.

कासा शाखेअंतर्गत २५ ते ३० गावांचा कार्यभार आहे. त्यातील अनेक गावे डोंगरदऱ्यांत असून, कार्यालयापर्यंत येण्यासाठी ४० ते ४५ किमी अंतर पार करावे लागते. ग्राहक विजेच्या समस्या, तक्रारी तसेच बिलाविषयक अडचणी घेऊन कासा येथे पोहोचतात; मात्र कार्यालय तिथे नसल्याचे समजल्यावर त्यांना सूर्यानगरला जावे लागते. ते आणखी सात किमी दूर आहे. परिणामी, वेळ आणि पैशांचा अपव्यय होत आहे.

दाभाडीहून ३६ किमी प्रवास करून कासा येथे आलो, पण कार्यालय सूर्यनगरला स्थलांतरित केल्याचे समजले. त्यामुळे मोठा त्रास झाला, असे दाभाडी येथील ग्राहक सुरेश जाधव यांनी सांगितले.
दरम्यान, सध्या पावसाळा सुरू असून झाडे कोसळणे, विजेचे खांब पडणे, तारा तुटणे अशा घटना वारंवार घडत आहेत. अशा वेळी महावितरणशी संपर्क साधणे आवश्यक ठरते. मात्र कार्यालय लांब गेल्यामुळे ग्राहकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

गेल्या सहा महिन्यांपूर्वी कासा येथील इमारत धोकादायक झाल्याने ती पाडण्यात आली. कार्यालय काही काळ चारोटी येथे होते आणि आता ते सूर्यानगर येथे स्थलांतरित केले आहे; मात्र कासा येथे नवीन जागा शोधण्याचे काम सुरू असून, लवकरच कार्यालय पुन्हा कासा येथे सुरू करण्यात येईल.
- गणेश दंडगव्हाळ, उपअभियंता

आम्ही अनेक किलोमीटर प्रवास करून कार्यालयात येतो, पण आता ते आणखी दूर नेल्यामुळे आमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जाते. हे कार्यालय पुन्हा कासा येथेच आणावे.
- प्रशांत सातवी, सरपंच वाघाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma ODI retirement: 'काय निवृत्ती घेऊ? प्रत्येकवेळी जिंकलो म्हणून...' रिषभ पंतला रोहितचा सवाल

Thane News: डोंबिवलीत जुनी इमारत पाडकामात महापालिकेच्या स्कायवॉकचे नुकसान, प्रवाशांसाठी मार्ग बंद

Latest Marathi News Live Updates : पिकअप अपघातातील बाराव्या महिलेचा मृत्यू

Dhananjay Munde: 'सातपुडा' बंगल्याप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांना कायदेशीर नोटीस; मुंडेंना धक्का

Instagram Friends Map : इंस्टाग्राममध्ये आलं मॅप फीचर; मुलींच्या सुरक्षेसाठी खूपच फायद्याचं, कसं वापरायचं लगेच पाहा

SCROLL FOR NEXT