मुंबई

महाजने-बेलोशी पुलाचे काम अपूर्ण

CD

अलिबाग, ता. २७ (वार्ताहर) ः तालुक्यातील महाजने-बेलोशीदरम्‍यान गावांना जोडणारा पूल जुना झाला आहे. त्‍याजागी जिल्हा परिषदेकडून नवीन पूल बांधण्यात येत आहे, मात्र काम अपूर्ण असल्‍याने ग्रामस्‍थांची गैरसोय होत आहे. काम वेळेवर न झाल्याने आणि दोन दिवस पडलेल्‍या मुसळधार पावसामुळे पूरस्‍थिती निर्माण झाल्‍याने गावांचा संपर्क तुटला. ठेकेदाराच्या हलगर्जीमुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त करीत तहसीलदारांकडे तक्रार केली. या वेळी तहसीलदार विक्रम पाटील यांनी तातडीने पाहणी करून योग्य ती व्यवस्था केली जाईल, असे आश्वासन दिले. त्याचप्रमाणे बांधकाम अधिकाऱ्यांना कार्यवाही करण्याची सूचना केली.
अलिबाग तालुक्यातील महाजने-बेलोशी या गावांना जोडणारा पूल जुना होता. या पुलाच्या जागी नवीन पूल बांधण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून सुमारे ७८ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. नवीन पुलाचे काम मार्चच्या शेवटच्या आठवड्यात सुरू झाले, मात्र काम योग्य पद्धतीने होत नसल्याने काही ग्रामस्थांनी आवाज उठवला. ही बाब जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्यासह अलिबागचे अभियंता यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर अभियंता राहुल शेळके यांनी प्रत्यक्ष भेट देत योग्य पद्धतीने काम करण्याची सूचना केली. मे महिन्यापर्यंत काम पूर्ण होण्याची अपेक्षा होती, मात्र संथ गतीने सुरू असलेल्या कामामुळे महाजने-बेलोशीतील नागरिकांना पर्यायी कच्च्या रस्त्याचा आधार घ्यावा लागला.
नवीन पुलाचे काम अपूर्ण व कूर्म गतीने सुरू असल्‍याचा फटका विद्यार्थी, रुग्ण व उन्हाळी सुट्टीत गावी आलेल्या नागरिकांना बसला. ठेकेदाराच्या मनमानी व सुस्त कारभाराबाबत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. तहसीलदारांकडे तक्रार करीत महाजने-बेलोशी मार्ग मोकळा करण्यात यावा, अशी मागणी केली. या वेळी योग्य ती व्यवस्था केली जाईल, असे आश्वासन तहसीलदार विक्रम पाटील यांनी दिले.

दोन दिवसांपासून मॉन्सूनपूर्व पाऊस पडतो आहे. या पावसात महाजने नदीची पातळी वाढल्‍याने पूरस्‍थिती निर्माण झाली होती. कच्चा रस्ता वाहतुकीत बंद झाल्‍याने महाजने-बेलोशी गावाचा संपर्क तुटला. अत्यावश्यक सेवाही ठप्प झाली. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! 'जैश-ए-मोहम्मद'चे तीन दहशतवादी भारतात घुसले; बिहार पोलिसांकडून हाय अलर्ट जारी, तिघंही आहेत पाकिस्तानी

AAI Recruitment 2025: परीक्षा न देता मिळवा सरकारी नोकरी! एअरपोर्ट प्राधिकरणात मेगा भरती सुरू; जाणून घ्या अर्ज कसा करावा?

Gmail Delete : मेल बॉक्स फूल झालाय? नको असणारे हजारो ईमेल डिलीट करा एका क्लिकवर..

VIDEO: जॅकलिनला पार्थ पवारने दिले लालबागच्या राजाचरणी अर्पण करायला पैसे, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल,

Manoj Jarange: हिंदूंच्या महत्त्वाच्या सणकाळात... मनोज जरांगेंच्या आंदोलनावर बावनकुळेंचे परखड मत, फडणवीसांवरील टीकेचा निषेध

SCROLL FOR NEXT