मुंबई

कल्याण रेल्वेस्थानकात लाखोंचा गांजा जप्त

CD

कल्याण, ता. २७ (बातमीदार) : कल्याण रेल्वेस्थानकात आलेल्या एका संशयास्पद प्रवाशाची सुरक्षा बलाच्या जवानांनी सोमवारी (ता. २६) तपासणी केली. त्यावेळी त्या प्रवाशाजवळील पिशवीत आठ किलो वजनाचा लाखो रुपयांचा गांजा आढळून आला. हा व्यक्ती गुजरातमधील रहिवासी आहे. या गांजाची बाजारातील किंमत लाखो रुपयांची आहे, असे रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी स्पष्ट केले आहे.
कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक सातवरून लांब पल्ल्याच्या मेल, एक्स्प्रेस सुटतात. त्यामुळे फलाट पाच ते सातवर सुरक्षा बळाचे पोलिस सतत तैनात असतात. सोमवारी दुपारी रेल्वे सुरक्षा बलाचे जवान नेहमीप्रमाणे स्थानकातील फलाट क्रमांक सातवर तैनात होते. त्याच वेळी एक व्यक्ती फलाटावर फिरत असल्याचे दिसले. तो फलाटावर येणाऱ्या कोणत्याही मेल, एक्स्प्रेसमध्ये चढत नव्हता. हा प्रवासी कोठेही जात नाही. तो बराच उशीर फलाटावर रेंगाळत असल्याने लोहमार्ग पोलिस आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांना संशय आला. त्याच्याजवळ प्रवासी वाहतुकीची मोठी पिशवी होती. हा प्रवासी संशयास्पद वाटत असल्याने जवानांनी त्याच्यावर पाळत ठेवली.
एक जवान फलाट त्या संशयास्पद प्रवाशाजवळ गेला. त्याने त्याच्याकडे चौकशी केली. त्या वेळी संबंधित संशयास्पद व्यक्ती गांगरला. तो पोलिसांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देऊ शकला नाही. नरेशकुमार मनोहरभाई पंचोली (३४) असे नाव त्याने पोलिसांना सांगितले. तसेच, आपण गुजरात येथील रहिवासी असल्याचे स्पष्ट केले. पोलिसांनी नरेशकुमार पंचोली या व्यक्तीला ताब्यात घेतले. त्यांना रेल्वे सुरक्षा बलाच्या दालनात नेले. तेथे त्याची कसून चौकशी आणि तपासणी केली. त्यांच्या पिशवीत आठ किलो ३०० ग्रॅम वजनाचा गांजा सदृश्य अमली पदार्थ आढळून आला. पोलिसांनी त्याला तत्काळ अटक केली.
ही कारवाई लोहमार्ग पोलिस ठाण्याचे पोलिस उपायुक्त मनोज पाटील, सहाय्यक पोलिस आयुक्त पोखरकर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण लोहमार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरी कांदे, पोलिस निरीक्षक चव्हाण, उपनिरीक्षक जगताप, रेल्वे सुरक्षा बलाचे वरिष्ठ निरीक्षक गौरीशंंकर एडले, सहाय्यक उपनिरीक्षक विजय पाटील आणि पथकाने केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission : ‘’राजकीय पक्षांनी वेळीच आक्षेप नोंदवले नाहीत, जर असे घडले असते तर.. ‘' ; निवडणूक आयोगाने स्पष्टचं सांगितल!

Dahi Handi Festival : सरीवर सर! थरावर थर!! राज्यभरात दहीहंडीचा जल्लोष

INDIA Alliance News : 'मतचोरीच्या' विरोधात 'I.N.D.I.A' आघाडीचा 'मतदार हक्क यात्रा'द्वारे बिहारमध्ये एल्गार!

हसत खेळत असलेली बाई अशी... पुर्णा आजीच्या जाण्याचा प्रेक्षकांनाही बसला धक्का; म्हणाले- मन मानायलाच तयार नाही की...

WhatsApp: एक व्हिडिओ कॉल अन् बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या कसा होतोय लेटेस्ट फ्रॉड

SCROLL FOR NEXT