शहापूर, ता. २७ (वार्ताहर) : तालुक्यातील भाजीपाला तसेच दुबार उन्हाळी भातपिके घेणाऱ्या शेतकऱ्यांचे अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी शहापूर भाजपने केली आहे.
मे महिन्याच्या सुरुवातीला भातसा धरणाच्या उजव्या कालव्यावर तालुक्यातील आवरे, कांबारे, चेरपोली, तुते, अर्जुनली, पिंपळपाडा, काळेपाडा, कवडास सरलांबे, साजिवली, सावरशेत, खुटारी, खरीवली गावांमधील शेतजमीन ओलिताखाली आहे. येथील शेतकरी उन्हाळी भात तसेच भाजीपाल्याचे पीक घेतात. पण अचानक आलेल्या अवकाळी पावसाने त्याचे नुकसान झाले आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांनी विनंती करूनही भातसा धरण विभागाने १ मेदरम्यान कालव्याचे पाणी बंद केले नसल्याचा फटका पिकांना बसला आहे. शेतातील भाताचे उभे पीक भिजत पडले आहे. तसेच पालेभाज्या सडल्याने या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी मंगळवारी (ता. २७) भाजपच्या आदिवासी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक इरनक यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी, पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार परमेश्वर कासुळे यांची भेट घेऊन केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.