गांजाविक्रीप्रकरणी मनसे शहर उपाध्यक्षाला अटक
भिवंडी, ता. २७ (वार्ताहर) : भिवंडी शहरात गांजा व इतर अमली पदार्थांची सरस सर्रासपणे विक्री व सेवन होत आहे. भिवंडी गुन्हे शाखेच्या कारवाईत तीन किलो ९६० ग्रॅम वजनाचा गांजाविक्रीसाठी बाळगणाऱ्या मनसेच्या भिवंडी शहर उपाध्यक्ष असणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. कुमार व्यंकटेश पुजारी (वय ३४) असे अटक केलेल्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. या कारवाईमुळे शहरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
शहरातील कोंबडपाडा परीसरात संशयित व्यक्ती गांजाविक्री करीत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने कोंबडपाडा परिसरात मोकळ्या मैदानात सापळा रचून मनसे शहर उपाध्यक्ष कुमार व्यंकटेश पुजारी यास ताब्यात घेत त्याची तपासणी केली. या वेळी त्याच्याजवळ गांजा, मोबाईल व रोख रक्कम असा एक लाख २८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला. गुन्हे शाखेने त्याच्याविरोधात निजामपूर पोलिस ठाण्यात अमली पदार्थ विरोधी कायद्याने गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
भिवंडी न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी ठोठावली आहे. मनसेसारख्या राजकीय पक्षाच्या भिवंडी शहर उपाध्यक्षाच्या अटकेमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. सध्या या प्रकरणाचा सखोल तपास भिवंडी गुन्हे शाखा करत आहे. याबाबत मनसे शहर अध्यक्ष मनोज गुळवी यांच्याकडे कुमार व्यंकटेश पुजारी हा पदाधिकारी असल्याबाबत चौकशी केली असता त्यांनी त्याची हकालपट्टी केल्याची माहिती दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.