मुंबई

राज्यातील शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या : हर्षवर्धन सपकाळ

CD

राज्यातील शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या : हर्षवर्धन सपकाळ
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : ‘राज्यात मुसळधार पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून, संकटातील शेतकऱ्याला मदतीची गरज आहे. दुसरीकडे राज्याचे मंत्रिमंडळ, मात्र अमित शहा यांची खुशामत करण्यात मग्न आहे. पंचनाम्याचे सरकारी सोपस्कर बाजूला ठेवून सरकारने नुकसानग्रस्तांना एकरी २० हजार रुपये मदत तातडीने द्यावी,’ अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.

गांधी भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान सपकाळ म्हणाले, की बळीराजा संकटात आल्यास त्याला तातडीने मदत करण्याचे काम काँग्रेसचे सरकार असताना अनेकदा करण्यात आले. खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच मोठे संकट आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी मोफत बियाणे व खते द्यावीत. दुसरीकडे महाराष्ट्रावर ओढवलेल्या संकटावर अमित शहा एक शब्दही बोलले नाहीत. आता दिल्लीला जाण्यापूर्वी तरी त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा करून जावे. कारण राज्यातील सरकार अमित शहा यांच्या शब्दाशिवाय कामच करीत नाही,’ असा टोमणाही सपकाळ यांनी लगावला.
...
पावसाने भ्रष्टाचाराची पोलखोल
‘कोट्यवधी रुपये खर्च करूनही मुंबईत जागोजागी पाणी साचले, सर्व व्यवस्था कोलमडली. भुयारी मेट्रो मुंबईत शक्य नसल्याचा ‘एमएमआरडीए’चा अहवाल असतानाही काही लोकांच्या हट्टासाठी हा प्रकल्प राबविला. त्याचे परिणाम आज दिसत आहेत. २५ वर्षे भाजप-शिवसेनेसोबत मुंबई महापालिकेत सत्तेत होती. एकनाथ शिंदे सातत्याने नगरविकास खात्याचे मंत्री आहेत. मग या काळात भाजप व एकनाथ शिंदे यांनी काय केले,’ असा प्रश्नही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT