मुंबई

पाउस

CD

जमीन खचल्‍याने घराची भिंत कोसळली
पोलादपूर (बातमीदार) ः तालुक्यात पळचील ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील गोलदरा येथील रमेश राजाराम शेलार यांच्या घराच्या बाहेरील भिंत कोसळली असून, हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. २४ तासांत पोलादपूरमध्ये ९४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गोलदरामधील शेलार यांच्या घरालगतची जमीन खचल्‍याने भिंतीचे पडझड झाली. ढवळी, कामथी, चोळईसह घोडवली या नद्या तुडुंब भरल्‍या असून, नदीलगतचा कचरा प्रवाहाबरोबरच वाहून जात आहे.

............

महामार्गावर खांबजवळ खड्ड्यात अडकल्‍या बस
पाली, ता. २७ (वार्ताहर) ः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर खांब गावाजवळ भला मोठा खड्डा पडला आहे. सोमवारी (ता. २६) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास खड्ड्यात दोन बस अडकल्याने वाहतूक बंद झाली होती. क्रेनच्या साह्याने दोन्ही बस बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. अखेर दीडच्या सुमारास दोन्ही बस बाहेर काढण्यात आले आणि वाहतूक सुरळीत झाली. सह्याद्री वन्यजीव संरक्षणार्थ सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी घटनास्थळी उपस्थित असून, दोन्ही बस बाजूला काढण्यासाठी सहकार्य केले. तसेच वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले.

पाली ः खड्ड्यात बस अडकली होती.

.................

खोपोलीत काजूवाडीतील टेकडी ढासळली
तहसीलदारांकडून पाहणी; उर्वरित भाग रेड झोन घोषित करणार

खालापूर (बातमीदार) ः अतिवृष्‍टीमुळे खोपोली शहरातील भानवज परिसरातील सहकार नगर भागात काजूवाडीतील टेकडीचा काही भाग ढासळला. याबाबत माहिती मिळताच, खालापूरचे तहसीलदार अभय चव्हाण, उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, माजी उपनगराध्यक्ष राजू गायकवाड, मंडळ अधिकारी भरत सावंत, पोलिस निरीक्षक शीतल कुमार राऊत, खोपोली नगर परिषदेचे अधिकारी आणि अग्निशमन पथकाने पाहणी करून धोकादायक परिस्थितीचा अंदाज घेतला. तात्पुरती उपाययोजना म्हणून या ठिकाणचा मार्ग बंद करून पर्यायी मार्गाने वाहतूक व पादचाऱ्यांनी ये-जा करावी, अशा सूचना प्रशासनाने केल्या. सोमवारी रात्री नऊच्या सुमारास वादळी पावसामुळे काजूवाडी टेकडीचा भाग कोसळला.
दगड मातीचा ढिगारा रस्त्‍यावर आल्‍याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. या ठिकाणी चार रहिवासी इमारती, दोन बंगले असून, त्‍यांचा रहदारीचा मार्ग आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने बॅरिकेड्स लावून रस्ता बंद केला. मंगळवारी आपत्ती विभागाने घटनास्थळी भेट देत टेकडीची पाहणी केली.
काजूवाडी टेकडीवर प्लॉटिंग करण्यासाठी अनेकदा खोदाई करण्यात आली आहे. टेकडीवर आदिवासीवाडी तसेच लोकवस्ती असून, खाली इमारती आहेत. भविष्यात धोका निर्माण होऊ नये यासाठी तहसीलदार अभय चव्हाण यांनी तातडीने टेकडीचा उर्वरित भाग रेड झोनमध्ये समाविष्ट करण्याच्या सूचना नगर परिषद प्रशासनाला दिल्या. नव्याने तयार होत असलेल्या विकास आराखड्यात टेकडीवर उत्खनन होऊ नये, अशा सूचनाही दिल्या आहेत.

आपत्‍कालीन यंत्रणांची तारांबळ
खोपोली (बातमीदार) ः दोन दिवस कोसळलेल्या ढगफुटीसदृश पावसाने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. खोपोली परिसरातील काजूवाडीत दरडप्रवण रहिवासी भागात डोंगरावरील माती, मोठमोठे दगड रस्‍त्‍यावर आल्‍याने आपत्कालीन यंत्रणांचीही तारांबळ उडाली. येथील रस्ता बंद करून रहिवाशांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. खोपोली धुवाधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले होते. नगरपालिका व महसूल प्रशासनास हा धोक्याचा इशारा असून, अनियंत्रित बांधकामे, विकास कामांसाठी बेकायदा डोंगर पोखरला जात असल्‍याने भविष्‍यात माळीण किंवा इर्शाळवाडीसारखी मोठी दुर्घटनेची शक्‍यता नागरिकांकडून वर्तवण्यात येत आहे.

पावसाचा जोर पाहता, नगरपालिकेतील अग्निशमन दलाचे कर्मचारी, आपत्कालीन यंत्रणा व सामाजिक कार्यकर्ते सतर्क होते. तातडीने रस्त्यावरील माती व दगड हटवण्यात आला असून, रस्ता
वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
- डॉ. पंकज पाटील, मुख्याधिकारी, खोपोली

खोपोली : काजूवाडी डोंगरावरील दगड, मातीचा ढीग रस्‍त्‍यावर आला होता.

...................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dombivli west Building : मोठी बातमी! डोंबिवली पश्चिमेतील 25 कुटुंब राहत असलेली चार मजली इमारत खचली!

Rahul Gandhi and Mallikarjun Kharge: ...म्हणून यंदा राहुल गांधी अन् खर्गे लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला गेले नाहीत!

Lionel Messi चा तीन दिवसीय भारत दौरा, मुंबईत वानखेडेसह ब्रेबॉनवरही खेळणार, कधी आणि केव्हा? वाचा संपूर्ण वेळापत्रक

Love Jihad : हैदाराबादेत 'लव्ह जिहाद'चं प्रकरण उघडकीस; मूळचा पाकिस्तानी असणाऱ्या भामट्याने हिंदू मुलीला फसवलं अन्...

Maharashtra Rain Alert: पुढील दिवस महत्त्वाचे! मुंबईला मुसळधारेचा इशारा, महाराष्ट्रात कसे असेल हवामान?

SCROLL FOR NEXT