मुंबई

५८ ठिकाणी पाणी तुंबण्याची भीती

CD

५८ ठिकाणी पाणी तुंबण्याची भीती
पालिका करणार प्रतिबंधात्मक उपाययोजना
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २७ : महापालिका क्षेत्रात पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याने आपत्ती निर्माण होते. तसेच नाला व गटाराचे पाणी घरात शिरण्याचे प्रकारदेखील घडत असतात. अशी पाणी तुंबणारी ५८ ठिकाणे पालिकेने निश्चित केली आहेत. या ठिकाणी आपत्कालीन परिस्थितीत उपाययोजना करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी एका कर्मचाऱ्याची नेमणूक केली आहे. त्यामुळे पाणी तुंबणाऱ्या ठिकाणची माहिती तत्काळ मिळणार आहे. तसेच तेथील परिस्थितीचा आढावा घेण्याबरोबरच प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी मदत होणार असल्याची माहिती घनकचरा विभागाने दिली.

पावसाळ्यात नालेसफाई वेळेत पूर्ण न झाल्याने नाले तुंबल्याने पाणी साचण्याच्या घटना घडत असतात. त्यामुळे दुर्घटनादेखील घडण्याची शक्यता असते. त्यामुळे यंदा पावसाळ्यात पाणी तुंबून दुर्घटना घडू नये, यासाठी पालिकेने वेळेत नालेसफाई व्हावी, यासाठी नियोजन आखले आहे. असे असले तरी यंदाच्या वर्षी मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच आलेल्या अवकाळी पावसाने नालेसफाईच्या कामाला ब्रेक लावला आहे. अशातच नुकत्याच झालेल्या पावसाने ठाणे शहरासह ग्रामीण भागात दाणादाण उडाली आहे.

ठाणे शहरात जिल्ह्यातील इतर भागाच्या तुलनेत कमी पाऊस झाला असला तरी आगामी पावसाळ्याच्या काळात ठाणे शहरातील विविध भागात नाले व गटारे तुंबून पाणी साचण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर उपाययोजना आखण्यासाठी ठाणे पालिकेच्या घनकचरा विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार ५८ पाणी साचण्याची ठिकाणे निश्चित केली असून या प्रत्येक ठिकाणी पावसाळ्याच्या काळात एका कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात येणार आहे. हा कर्मचारी नेमणुकीच्या ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाल्यास, पंप बसविणे, नाल्यात पावसाळ्यात कचरा साचल्यास तो बाजूला करण्यासाठी जेसीबी बोलविणे अथवा आवश्यक मनुष्यबळ वापरणे, चेंबर चोकअप होणे आदी कामे करण्यात येणार आहे. यामुळे पाणी साचून निर्माण होणाऱ्या आपत्तीजनक परिस्थितीवर तत्काळ उपाययोजना करण्यास मदत होणार आहे, असा दावा पालिकेच्या घनकचरा विभागाने केला आहे.

पाणी तुंबण्याची ठिकाणे
चिखलवाडी, रतनभाई कंपाउंड, सुर्वेवाडी, भटवाडी, सम्राटनगर, हाजुरी, चेन्द्राणी कोळीवाडा, कळवा येथील रेल्वे कल्वर्ट परिसर आदी ५८ ठिकाणे निश्चित केली आहेत.

ठाणे पालिका क्षेत्रात थोड्या प्रमाणात पाऊस झाला तरी, अनेक ठिकाणी पाणी साचत असते. अशी ५८ ठिकाणे निश्चित केली असून या ठिकाणी एका कर्मचाऱ्याची नेमणूक केली आहे. या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून तेथील परस्थितीचा आढावा घेता येणार आहे. तसेच त्या ठिकाणी पाणी साचण्याची स्थिती निर्माण झाल्यास तत्काळ उपाययोजना करण्यास मदत होणार आहे.
- मनीष जोशी, उपायुक्त, ठाणे महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कुख्यात गुंड सलमान त्यागीने तुरुंगात घेतला गळफास? चादरीला लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, लॉरेन्स बिश्नोईसाठी करत होता काम

R R Aba Patil यांना वॉचमनची नोकरी नाकारली, पुढे त्यांनी सर्वात मोठी Police Bharti केली! राजकीय किस्सा

Tehran Movie Review: जॉन अब्राहम आणि देशभक्तीचा फॉर्मुला चालला की नाही? ओटीटीवर 'तेहरान' पाहण्यापूर्वी हा रिव्ह्यू वाचा

Mumbai Rain Alert: मुंबईकरांनो सावधान! हवामान विभागाकडून पावसाचा रेड अलर्ट जारी

Dharmasthal Temple : धर्मस्थळ मंदिर परिसरात गाडले शेकडो मृतदेह; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'काळा डाग लावण्याचा प्रयत्न, हे मोठं षड्‌यंत्र...'

SCROLL FOR NEXT