मुंबई

रोहयोअंतर्गत जिल्ह्यातून १४ हजार ४७९ अर्ज प्राप्त

CD

रोहयोअंतर्गत जिल्ह्यातून १४ हजार ४७९ अर्ज प्राप्त
अलिबाग, ता. २७ (वार्ताहर) ः महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत रायगड जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत स्तरावर नुकतेच विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांकडून वैयक्तिक लाभाच्या योजनेचे प्रस्ताव मागविण्यात आले होते. शिबिरांना नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला असून, १४ हजार ४७९ जणांचे अर्ज प्राप्त झाले आहेत.
ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करून देणे, कुशल व अकुशल कामांच्या मदतीने ग्रामीण भागातील उत्पन्न व पायाभूत सुविधा विकसित करणे हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून रोहयोंतर्गत ग्रामपंचायत स्तरावरील विशेष शिबिरे आयोजित करण्यात आली होती. वैयक्तिक लाभाच्या योजनेंतर्गत प्रतिलाभार्थी फळबाग लागवड, वृक्षलागवड, बांबूलागवड करण्यासाठी एक लाख ६९ हजार रुपयांचे अनुदान तीन वर्षांसाठी देण्यात येते. तसेच वैयक्तिक विहिरीसाठी पाच लाख, शेतीची बांधबंधिस्ती व दुरुस्ती २५ हजार प्रति हेक्टरी, वैयक्तिक शौचालय १२ हजार, शोषखड्डा, कंपोस्ट खड्डा पाच हजार, शेळीपालन शेड, कुक्कुटपालन शेड ५० हजार, गोठ शेड एक लाख ७७ हजार रुपये असा लाभ देण्यात येतो. या कामांसाठी जिल्हाभरातून एकूण १४ हजार ४७९ अर्ज प्राप्त झाले असून, यामध्ये फळबाग लागवड एक हजार ९९९ अर्ज प्राप्त झाले असून, वैयक्तिक विहिरीसाठी एक हजार १९१, शेत बांधबंधिस्ती व दुरुस्तीसाठी एक हजार २९० तर उर्वरित कामांसाठी नऊ हजार १९९ अर्ज प्राप्त झाले आहेत.
...................
कोट:
यापुढेही नागरिकांना वैयक्तिक कामांची मागणी करता येणार आहे. इच्छुक लाभार्थ्यांनी कामाच्या मागणीसाठी आपल्या नजीकच्या ग्रामपंचायत कार्यालय किंवा पंचायत समिती कार्यालयाशी संपर्क साधावा. ग्रामपंचायतींनी जास्तीत जास्त ग्रामस्थांना योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करावे.
- नेहा भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT