मुंबई

विजेच्या खोळंब्याने नागरिक त्रस्त

CD

विजेच्या खोळंब्याने नागरिक त्रस्त
पोयनाड, ता. २७ (बातमीदार) : मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्‍कळित झाले आहे. याचा सर्वात जास्त त्रास हा वीजग्राहकांना सोसावा लागत आहे. पोयनाड परिसरात पोयनाड, पेझारीसह लहानमोठी गावे आणि आदिवासी वाड्या-पाड्यात विजेचा लपंडाव सुरू असल्याने अनेकांची गैरसोय होत आहे.
या परिसरात विजेचा दैनंदिन वापर करणारे वापरकर्ते मोठ्या संख्येने आहेत, मात्र मागील दोन ते तीन दिवसांपासून होणाऱ्या मुसळधार पावसामुळे परिसरातील वीजपुरवठा सातत्याने खंडित होत आहे. पाऊस पडून गेल्याने हवेत गारवा निर्माण झाला असला तरी खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. शासकीय कार्यालय, रुग्णालय, बाजारपेठ, बँका, सायबर कॅफे, गिरणी, व्यापारी संकुल, व्यायामशाळा यांना सातत्याने खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याचा त्रास होत आहे, तर सातत्याने खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे परिसरातील इंटरनेट सेवादेखील ठप्प झाली आहे.
पावसाळापूर्व विजेची कामे लवकरात लवकर करून हा सातत्याने खंडित होणार वीजपुरवठा थांबवावा, अशी मागणी महावितरणकडे नागरिक करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune University: चला रे पोट्टेहो कुलगुरूंच्या घरी जेवायला... पुणे विद्यापीठात गॅस संपला? विद्यार्थ्यांचा इशारा! खानावळी बंद होणार?

'ऑपरेशन सिंदूर'ची खिल्ली ते शिखर धवनचं तोंड फोडण्याची इच्छा! Abrar Ahmed चे कारनामे माहित असूनही काव्या मारन अशी का वागली?

Mojtaba Khamenei : इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई कोमात ? पाय कापल्याच्या दाव्याने खळबळ

Tajmahal Name: ताजमहलचे नाव बदलणार? मोदी सरकारचा सर्वात मोठा खुलासा! संसदेत दिले थेट उत्तर

'लग्नानंतर होईलच प्रेम'फेम काव्याच्या रिअल लाईफ बाबांनी सगळ्यासमोर केली पोलखोल, डोक्यावर हात मारत म्हणाले...'ही नुसती...'

SCROLL FOR NEXT