कृषी विभागाच्या विविध योजनांसाठी शेकडो शेतकऱ्यांची निवड
अलिबाग, ता. २७ (वार्ताहर) ः रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या विविध योजनेसाठी महाडीबीटी पोर्टल सुरू असलेल्या योजनेसाठी अर्ज केले होते. या अर्जासंदर्भात महाडीबीटीवरील अर्ज प्रक्रियेमध्ये प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर जिल्ह्यातील एकूण ८०८ शेतकऱ्यांची निवड झाली आहे. याबाबत शेतकऱ्यांना लघुसंदेश पाठवण्यात आला असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वंदना शिंदे यांनी दिली आहे.
कृषी विभागाच्या विविध योजनेसाठी महाडीबीटी पोर्टल सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या विविध योजनेसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज दाखल केले आहेत. या अर्जासंदर्भात महाडीबीटीवरील अर्ज प्रक्रियेमध्ये प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर जिल्ह्यातील एकूण ८०८ शेतकऱ्यांची निवड झाली आहे. ही यादी महाडीबीटी पोर्टल, कृषी विभागाचे संकेतस्थळ तसेच कृषी विभागाच्या क्षेत्रीय अधिकारी यांच्या लॉगिनवरसुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांची योजनेंतर्गत निवड झाली आहे, अशा शेतकऱ्यांनी येत्या १० दिवसांमध्ये आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावयाची आहे. त्यानंतर पात्र लाभार्थ्यांना तत्काळ पूर्वसंमती मिळणार आहे. तसेच फार्मर आयडी आधारे लॉगिन केल्यानंतर पुढील माहिती मिळू शकणार आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी ॲग्रोस्टेक योजनेअंतर्गत फार्मर आयडी काढला नसेल त्यांनी नजीकच्या सी. एस. सी केंद्रात जाऊन काढून घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पात्र लाभार्थ्यांकडून येत्या १० दिवसांत कागदपत्रांची पूर्तता न झाल्यास तो अर्ज आपोआप रद्द होणार आहे. त्याकरिता ज्या शेतकरी बांधवांना योजनेत निवड झाल्याबाबत लघुसंदेश प्राप्त झाला असेल, त्यांनी वेळेत आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत, तसेच अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.