मुंबई

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरोघरी सर्वेक्षण

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २७ : जिल्ह्यातील महापालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना, दुसरीकडे ग्रामीण भागात एकही रुग्ण आढळून आलेला नाही. असे असले तरी, खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घरोघरी सर्वेक्षण सुरू केले आहे.
ठाणे जिल्ह्यातील पालिका आणि कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रात कोरोना आजाराने प्रत्येकी एक रुग्ण दगावले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कोरोना महामारी आजाराचा धोका बळावत असल्याचे दिसून येत आहे. अशातच जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव होऊ नये, यासाठी जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. सोमवारी जिल्हा आरोग्य अधिकारी यांची तालुकास्तरीय आरोग्य अधिकारी आणि सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रावरील वैद्यकीय अधिकारी यांच्यासोबत दृकश्राव्य प्रणालीद्वारे बैठक घेण्यात आली. या बैठकीत सर्व अधिकाऱ्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची माहिती घेणे गरजेचे आहे. तसेच उपचारासाठी येणाऱ्या ज्या रुग्णांना वारंवार सर्दी, खोकला किंवा ताप येत असेल अशा रुग्णांची तात्काळ कोरोना चाचणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच रुग्णाची लक्षणांनुसार गृहविलगीकरण की, रुग्णालयात उपचार करायचे याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. तसेच रुग्णाचे नाव, पत्ता, वय, सहव्याधी असल्यास त्याची माहिती, कोरोना लसीकरणाचा अहवाल अशी सर्व माहिती एकत्रित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
-------------------------------------
ग्रामीण भागावर विशेष लक्ष
ग्रामीण भागात अद्याप तरी कोरोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाही, परंतु खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामीण भागात घरोघरी नागरिकांचे सर्वेक्षण केले जात आहे. यात नागरिकांना सर्दी, खोकला किंवा ताप आहे का याची तपासणी केली जात असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काव्या मारनच्या संघाने पाकिस्तानी अबरार अहमदला करारबद्ध केले... BCCI ने दिली प्रतिक्रिया; म्हणतात, आमचा काही संबंध नाही

स्टार प्रवाह पुरस्कार सोहळ्यात कलाकारांच्या गुरुजनांना मानाचा मुजरा, गुरु-शिष्याची अनोखी जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस

Mumbai News: ताडदेवस्थित वेलिंग्डन हाइट्सचे प्रकरण; तातडीच्या सुनावणीस न्यायालयाचा नकार, कोर्टात काय घडलं?

LPG Booking: गॅस सिलेंडर बुकिंग नियमात आठवड्यात 3 वेळा बदल! गावाकडे आता किती दिवसांनी करता येणार बुकिंग?

Clerk Bribery Viral Video : निवृत्त महिलेकडून 45 हजारांची लाच घेताना बडा लिपिक कॅमेऱ्यात कैद; नोटा मोजतानाचा तोरा तर पाहा, आरोग्य विभागात खळबळ

SCROLL FOR NEXT