नवी दिल्ली, ता. २७ ः यूपीआय ॲपवरून बॅलन्स अथवा व्यवहार तपासणे आणि ऑटोपे करणे आता महागणार आहे. नॅशनल पेमेंटस कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय)ने यासंबंधी नवे निर्देश जारी केले आहेत.
यानुसार ३१ जुलैपासून यूपीआयवर सर्वात जास्त वापर होणाऱ्या फिचर्सवर मर्यादा येणार आहे. व्यवहार तपासणे, ऑटोपे आदी दिवसभर वापरात येणारे फिचर्स एका मर्यादित संख्येतच वापरात येणार आहेत. यूपीआयवर अधिक भार न येण्यासाठी एनपीसीआयने हा निर्णय घेतला आहे. ३१ जुलैपासून ग्राहक एका दिवसात जास्तीत जास्त ५० वेळाच बॅलन्स तपासू शकतो. बॅंकांना प्रत्येक व्यवहारानंतर ग्राहकांना बॅलन्सची माहिती पाठवायला लागेल. म्हणजेच ग्राहक सारखा बॅलन्स तपासणार नाही.
ऑटोपे केवळ नॉन-पिक अवर्समध्येच काम करणार
ओटीटी प्लॅटफॉर्म्स, एसआयपी आणि अन्य सर्व्हिससाठी ऑटोपे वापरले जाते. त्यांच्यासाठीही नवीन नियम असतील. ऑटोपे अधिकृतसाठी केवळ एकच प्रयत्न करण्यात येईल. प्रत्येक प्रयत्नात केवळ तीन वेळाच रिट्राय करता येईल. परंतु हे सर्व व्यवहार प्रतिसेंकद आणि नॉन पिक अवर्समध्येच ॲक्टिव्ह राहील. कोणताही व्यवहार अयशस्वी अथवा पेंडिंग झाला तर त्या व्यवहाराचे स्टेटस सातत्याने तपासण्यावरही मर्यादा राहील. कोणताही व्यवहार दोन तासांच्या अंतराने तीन वेळाच चेक करता येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.