एआयचा फटका! आयबीएमकडून आठ हजार नोकरकपात
नवी दिल्ली, ता. २७ ः तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे आयटी क्षेत्रात नोकऱ्यांची कपात होताना दिसत असते. नुकतीच मायक्रोसॉफ्टनेदेखील सुमारे ६,७०० कर्मचाऱ्यांची कपात केली होती. यापाठोपाठ आता आयबीएमनेही सुमारे आठ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढल्याची माहिती समोर आली आहे.
आयबीएमने अलीकडेच काही कामांसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर सुरू केला. एचआर विभागातील ठरावीक कामे आता एआय सॉफ्टवेअर करीत आहे. यामुळे जवळपास २०० एचआर पदे एआयकडे असून, आता नोकरकपातही झाली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, एआयचा वापर केल्याने वेळ आणि खर्च वाचतो आणि ही बचत सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, मार्केटिंग, विक्री यांसारख्या इतर महत्त्वाच्या विभागांत गुंतवली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.