‘ते’ शिष्य असल्याची लाज वाटते!
बाळासाहेब ठाकरे स्वप्नात आल्याचा म्हस्के यांचा दावा
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २७ : माझ्या जीवावर मोठे झालेले, खासदारकी मिळवणारे, कित्येक वर्षे मुंबई महापालिकेची सत्ता उपभोगणारे घरकोंबड्यासारखे घरात बसलेत. समाजकारणाचे मी दिलेल्या तत्त्वाचे पालन करीत नाहीत, ‘ते’ माझे शिष्य होते, याची मला लाज वाटते. याउलट एकनाथ शिंदे भरपावसात धावपळ करीत आहेत. त्याचा मला गर्व वाटतो, असे उद्गार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्वप्नात येऊन काढल्याचा दावा खासदार नरेश म्हस्के यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
संजय राऊत यांनी धर्मवीर आनंद दिघे यांचा कायम द्वेष केला. त्यांच्या मुलाखतीमुळेच दिघे यांना टाडा लागला. त्यामुळे राऊत यांच्या स्वप्नात धर्मवीर आनंद दिघे जाणे कधीच शक्य नाही, याउलट हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे आपल्या स्वप्नात आले होते, असे खासदार म्हस्के म्हणाले. बाळासाहेबांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुसळधार पावसातही मुंबई आणि ठाण्यात केलेल्या कामाचे कौतुक केले. शिंदे भरपावसात धावपळ करीत आहेत; मात्र माझ्या जीवावर मोठे झालेले, खासदारकी मिळवणारे, इतकी वर्षे मुंबई महापालिकेची सत्ता उपभोगणारे घरकोंबड्यासारखे घरात बसलेत. समाजकारणाचे मी दिलेल्या तत्त्वाचे पालन करीत नाहीत, हे माझे शिष्य होते, याची मला लाज वाटते, याउलट एकनाथ शिंदे यांचा गर्व वाटतो, असे उद्गार बाळासाहेबांनी स्वप्नात काढल्याचे म्हस्के म्हणाले.
----
शिंदेंना ‘मविआ’त डावलले जात होते!
महाविकास आघाडी सरकारमध्ये मुंबईच्या नियोजन बैठकीत नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना डावलले जात होते, असा गौप्यस्फोट खासदार म्हस्के यांनी या वेळी केला. यासंदर्भात संजय राऊत यांच्याकडे विचारणा केली असता, मुंबई महापालिका हा ठाकरे कुटुंबाचा विषय आहे. सर्व निर्णय ठाकरे आणि मित्र परिवार घेणार, एकनाथ शिंदेंना सांगा की मुंबई महापालिकेत लक्ष घालू नका, हा माझा निरोप दे, असे वक्तव्य राऊत यांनी केल्याचा दावा खासदार म्हस्के यांनी केला.
---
भ्रष्टाचाऱ्यांना टीकेचा अधिकार नाही
दरम्यान, कोरोना काळात खिचडी घोटाळा, बॉडीबॅग खरेदीमध्ये घोटाळा करणारे खरे भ्रष्टाचारी असून त्यांना शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्याचा अधिकार नाही, असा हल्लाबोल शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी ठाकरे गटावर केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.