मुंबई

बेलापूरच्या पंप हाऊसचे काम लवकर पूर्ण करा

CD

पंपहाउसचे काम
तातडीने पूर्ण करा!
आमदार मंदा म्हात्रे यांच्या सूचना
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २७ ः नवी मुंबईत सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे पहिल्यांदाच सीबीडी-बेलापूर सेक्टर ११ हा भाग पाण्यात गेला. ही परिस्थिती पुन्हा उद्भवू नये, याकरिता बेलापूरच्या पंपहाउसचे काम वेळेवर पूर्ण करा, अशा सूचना भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांंनी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांना केल्या.
नवी मुंबईत अतिवृष्टी होऊन जनजीवन विस्कळित झाले होते. त्या पार्श्वभूमीवर मंदा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळाने आज शिंदे यांची भेट घेतली. नवी मुंबईमध्ये सलग तीन दिवस सुरू असलेल्या संततधार पावसाने नागरिकांची दाणादाण उडवली. यंदा मॉन्सून लवकर येण्याचा अंदाज असतानाही महापालिकेने दुर्लक्ष करू नये. पावसाळ्यात सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश म्हात्रे यांनी महापालिकेला दिले. याप्रसंगी नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश पाटील, माजी नगरसेवक राजू शिंदे, बेलापूर मंडळ अध्यक्ष अजय सिंग, सीवूड्स मंडळ अध्यक्ष सुधीर जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT