मुंबई

नवी मुंबई महापालिकेविरोधात उबाठा गट आक्रमक

CD

नवी मुंबई महापालिकेविरोधात ठाकरे गट आक्रमक
नियमबाह्य काँक्रीटीकरण, वृक्षछाटणी वसुली रद्द करण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २७ ः मान्सूनपूर्व कामाच्या अनुषंगाने नवी मुंबई महापालिकेने केलेल्या नियमबाह्य विकासकामांविरोधात ठाकरे गट आक्रमक झाला आहे. पक्षाचे उपनेते विठ्ठल मोरे यांनी मंगळवारी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांची भेट घेत ही कामे रद्द करण्याची मागणी केली.
मान्सूनपूर्व वृक्षछाटणीसाठी महापालिकेने नुकताच प्रतिवृक्ष २०० रुपये परवानगी शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला. त्यास शिवसेना ठाकरे गटाने तीव्र विरोध केला. नवी मुंबईतील अनेक रस्ते तसेच चौकांचे काँक्रीटीकरण सुरू आहे. काही विशिष्ट लोकांच्या विभागांमध्ये आवश्यकता नसतानाही ही कामे केली जात आहेत. एप्रिल-मेमध्ये नालेसफाई करण्यात आली. त्यातील काही नाल्यांची सफाई निविदा प्रक्रिया आता राबविण्यात येत आहे. हे काम म्हणजे ‘वरातीमागून घोडे’ असल्याचे आयुक्तांना सांगण्यात आले.
नवी मुंबईतील बहुतांश खासगी शाळा त्यांना मिळालेल्या मैदानाचे रूपांतर टर्फमध्ये करून ती जागा भाड्याने देत आहेत. ही बाब आयुक्तांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. याप्रसंगी बेलापूर विधानसभा जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, ऐरोली जिल्हाप्रमुख प्रवीण म्हात्रे, उपजिल्हाप्रमुख अतुल कुलकर्णी, उपशहरप्रमुख समीर बागवान आदी पदाधिकारी उपस्थित होते.
--------------
नियमानुसार व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई का?
मुख्यमंत्री रोजगार स्वयंरोजगार योजनेअंतर्गत नवी मुंबईतील काही नागरिकांनी नियमानुसार शासनाकडून प्रशिक्षण घेऊन नवी मुंबईमध्ये फूड ट्रक व्यवसाय सुरू केले. सर्व प्रकारच्या परवानगी असूनही महापालिकेकडून त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. त्यांच्यावर कारवाई करू नये, अशी मागणी उपनेते विठ्ठल मोरे यांनी महापालिकेकडे केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra School: महाराष्ट्रातील सर्वच शाळांमध्ये मराठी अनिवार्य! न शिकवल्यास मान्यता रद्द होणार; महायुती सरकारचा मोठा निर्णय

काव्या मारनच्या संघाने पाकिस्तानी अबरार अहमदला करारबद्ध केले... BCCI ने दिली प्रतिक्रिया; म्हणतात, आमचा काही संबंध नाही

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरातील अंबाबाई मंदिराचा मुख्य गाभारा दर्शनासाठी बंद राहणार

स्टार प्रवाह पुरस्कार सोहळ्यात कलाकारांच्या गुरुजनांना मानाचा मुजरा, गुरु-शिष्याची अनोखी जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस

Mumbai News: ताडदेवस्थित वेलिंग्डन हाइट्सचे प्रकरण; तातडीच्या सुनावणीस न्यायालयाचा नकार, कोर्टात काय घडलं?

SCROLL FOR NEXT