मुंबई

‘आॅपरेशन सिंदूर’वर टीका करणाऱ्या विद्यार्थिनीची सुटका

CD

‘ऑपरेशन सिंदूर’बाबत लिहिणाऱ्या विद्यार्थिनीची सुटका
न्यायालयाचे सरकारला खडे बोल

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत समाजमाध्यमावरून प्रतिक्रिया व्यक्त करून नंतर ती हटवणाऱ्या पुणे येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातील १९ वर्षांच्या काश्मिरी विद्यार्थिनीची तातडीने सुटका करण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या सुट्टीकालीन खंडपीठाने मंगळवारी (ता. २७) राज्य सरकारला दिले. विद्यार्थिनीला काढून टाकण्याच्या महाविद्यालयाची कारवाईची भूमिका ही कट्टरपंथी असून, तिला कट्टर गुन्हेगारासारखी वागणूक देऊन आणि गुन्हेगार केले गेले, अशा कठोर शब्दांत न्यायालयाने सरकार आणि महाविद्यालय व्यवस्थापनाला खडे बोल सुनावले.
विद्यार्थिनीने चूक लक्षात आल्यानंतर सोशल मीडियावरून मेसेज हटविताना माफीही मागितली होती; तरीही तिला अटक केली गेली, हे प्रकरण या विद्यार्थिनीला कोठडीत ठेवण्यासारखेही नाही; तिच्या अटकेची आणि महाविद्यालयातून काढून टाकण्याची कारवाई तिचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यासारखी असल्यामुळे तिला तातडीने जामीन मंजूर करून मंगळवारी सायंकाळीच तिची येरवडा कारागृहातून सुटका करण्याचे आदेशही न्या. गौरी गोडसे आणि न्या. सोमशेखर सुंदरेसन यांच्या सुट्टीकालीन खंडपीठाने दिले. सकाळी याचिकेवर थोडक्यात सुनावणी घेतल्यानंतर न्यायालयाने सरकार आणि महाविद्यालयाच्या भूमिकेवर संताप व्यक्त करून विद्यार्थिनीला जामिनासाठी तातडीने अर्ज करण्यास सांगितले. या विद्यार्थिनीला बुधवारी (ता. २८) होणाऱ्या परीक्षेला बसता यावे, यासाठी जामीन अर्ज आजच मंजूर करू, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. त्यानुसार दुपारच्या सत्रात विद्यार्थिनीच्या वकील फरहाना शाह यांनी जामिनासाठी अर्ज केला.
...
काय म्हणाले न्यायालय?
१. विद्यार्थिनीने माफी मागितली; मात्र तिला सुधारण्याची संधी देण्याऐवजी राज्य सरकारने तिला अटक करून तिला गुन्हेगारांच्या कक्षेत उभे केले. हे प्रकरण अत्यंत धक्कादायक आहे.
२. विद्यार्थिनीने समाजमाध्यमावरून व्यक्त केलेली प्रतिक्रिया ही राष्ट्रहिताविरोधी असल्याचा दावा सरकारने केला आहे; परंतु तिच्या प्रतिक्रियेमुळे राष्ट्रीय हिताला कोणता धोका पोहोचणार होता?
३. महाविद्यालयाने मुलीला बाजू मांडण्याची संधीच दिली नाही. उलट घाईघाईने तिला काढून टाकण्याचा निर्णय घेतला. या वयात मुलांकडून चुका होणे स्वाभाविक आहे.
४. विद्यार्थिनीला बुधवारी परीक्षेला बसण्यासाठी हॉल तिकीट उपलब्ध करा.
...
प्रकरण काय?
मूळची जम्मू आणि काश्मीरची रहिवासी असलेली ही विद्यार्थिनी सिंहगड अकादमी ऑफ इंजिनिअरिंग विनाअनुदानित महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षाला शिकत आहे. तिने ७ मे रोजी इन्स्टाग्रामवरील अकाउंटवरून प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यात भारत सरकारने पाकिस्तानविरुद्ध युद्ध भडकवल्याची टीका केली होती. समाजमाध्यमावरील प्रतिक्रियेनंतर ९ मे रोजी या विद्यार्थिनीला अटक करण्यात आली होती. दुसरीकडे तिला महाविद्यालयातूनही काढून टाकण्यात आले. त्याविरोधात तिने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! एप्रिलमध्ये ‘या’ महिलांनाच मिळणार ३००० रुपये, ‘ई-केवायसी’ न केलेल्या महिलांचा बंद होणार लाभ, वाचा...

उज्ज्वला योजनेच्या महिलांच्या डोळ्यात धूर! ऑनलाइन बुकिंगसाठी ४५ दिवसांची अट; अन्नपूर्णा योजनेचा शासन निर्णय, पण अंमलबजावणी कागदावरच, वाचा...

Paneer Jowar Paratha: उन्हाळ्यात हलका पण पौष्टिक नाश्ता हवा असेल तर घरच्या घरी बनवा स्वादिष्ट पनीर ज्वारी पराठा

अग्रलेख : भारत- चीन व्यापाराचा नवा अध्याय

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : १४ मार्च २०२६ ते २० मार्च २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT