मुंबई

बीएसयूपी इमारतीच्या छताचे प्लॅस्टर कोसळले

CD

बीएसयूपी इमारतीच्या छताचे प्लॅस्टर कोसळले
जीवितहानी नाही; मत्र बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह!
बदलापूर, ता. २७ (बातमीदार) ः बदलापूरच्या बीएसयूपी घरकुल योजनेतील एका इमारतीच्या स्लॅबचे प्लॅस्टर मंगळवारी सायंकाळी कोसळले. या वेळी घरातील कोणालाही दुखापत झाली नसली, तरी इमारतीतील रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. तसेच सरकारी घरांच्या बांधकाम दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
बदलापूर पूर्वेकडील संभाजीनगर परिसरात कुळगाव-बदलापूर नगर परिषदेच्या माध्यमातून बीएसयूपी घरकुल योजनेच्या २० ते २५ इमारती उभारण्यात आल्या आहेत. त्यातील १९ क्रमांकाच्या इमारतीत चौथ्या मजल्यावर राहणाऱ्या रवि चव्हाण यांच्या घरातील स्लॅबचे प्लॅस्टर मंगळवारी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास अचानक कोसळले. या वेळी चव्हाण यांच्या पत्नी स्वयंपाक करीत होत्या, तर दीड वर्षाचा मुलगा तेथे खेळत होता. थोडक्यात ते या अपघातातून बचावले तरी बीएसयूपी इमारतीतील रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
---
प्रतिक्रिया
पालिकेने इमारतींचा ताबा रहिवाशांना दिला आहे. या घटनेनंतर उद्या सकाळी लगेच या इमारतींना स्वतः भेट देऊन बांधकामाचा आढावा घेतला जाईल. इमारत धोकादायक स्थितीत असल्यास स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येईल आणि तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येईल.
- मारुती गायकवाड,
मुख्याधिकारी, बदलापूर पालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT