मुंबई

ठाणेकरांच्या सुरक्षेला सुरुंग

CD

राजीव डाके ः सकाळ वृत्तसेवा
ठाणे शहर, ता.३१ ः ठाणे आणि मुंबईला शत्रुंच्या हल्ल्यापासून संरक्षणासाठी वायुदलाने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात यंत्रणा उभारली आहे. पण येऊरमधील वन विभागाच्या संवेदनशील भागातील चोरवाटांमुळे सर्वसामान्य नागरिकांचा वावर वाढल्याने सुरक्षा धोक्यात आली आहे.
पाकिस्तानसाठी हेरगिरीच्या आरोपाखाली कळव्यातून एका अभियंत्याला अटक झाल्यानंतर ठाण्यातील महत्त्वाच्या भागांच्या सुरक्षेचा विषय ऐरणीवर आला आहे. अशातच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील चारही बाजूंनी झालेले मानवी अतिक्रमण, येऊर परीक्षेत्राच्या हद्दीतील पाच हजारांहून अधिक बेकायदा झोपड्यांबरोबर ठाणे महापालिका, वनविभाग तसेच पोलिसांच्या आशीर्वादाने शेकडो बेकायदा बांधकामे उभी आहेत. त्यामुळे या परिसरातील इंदिरा नगर, येऊर, लोकमान्य पार्किंग, वारली पाडा, राम नगर, कैलास नगर, हनुमान नगर, उपवन, गावंडबाग वसाहतींमधून येऊरमधील संवेदनशील ठिकाणी जाणाऱ्या सुमारे ३० हून अधिक चोर वाटा तयार झाल्याने वायुदलाने उभारलेली सुरक्षा यंत्रणा धोक्यात आली आहे.
------------------------------------------
पर्यटकांच्या घुसखोरीचे प्रकार
पावसाळ्यात धबधब्याचा आनंद घेण्यासाठी ठाणे आणि ठाण्याबाहेरून अनेक पर्यटक येतात. यातील काही पर्यटकांना जंगलात फिरवण्यासाठी काही स्थानिक तरुण मदत करतात. त्यांना जंगलात दुरपर्यंत नेतात. अशा पर्यटकांवर वन विभागाकडून अनेकदा कारवाया केल्या आहेत. पण स्थानिकांच्या मदतीने पर्यटकांना वन विभागात दुरवर घेऊन जात असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने हा प्रकार धोकादायक आहे.
----------------------------------------------
मोबाईल टॉवरची बेकायदा उभारणी
वनविभागाच्या जागेत बसलेल्या बेकायदा झोपडपट्ट्यांमधील नागरिकांनी वन विभागात जाण्यासाठी काही पायवाटा तयार केल्या आहेत. त्यांचाही समाज कंटकांकडून वापर होण्याचा धोका आहे. तसेच वन विभागाच्या जागेत नागरी वसाहतीत मोबाईल टॉवर उभे करण्यात आले आहे. या टॉवरमुळे येथील सुरक्षेला धोका पोहचू शकतो. तसेच टॉवरचा दुरुपयोग केला जाण्याची भीती आहे.
-----------------------------------------
वन विभागात कोणी अनधिकृतपणे प्रवेश केला तर त्याच्यावर भारतीय वन कायदा अधिनियमानुसार कारवाई केली जाते. अशी घुसखोरी रोखण्यासाठी वन कर्मचाऱ्यांची पेट्रोलिंग सुरु असते.
ृ- मयूर सुरवसे, वनपरिक्षेत्र अधिकारी, येऊर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Drug Injections: हडपसरमध्ये नशेच्या इंजेक्शनची बेकायदा विक्री उघड; सराईत गुन्हेगार अभिषेक भडंगे अटक, ८२ बाटल्या जप्त

Auto Taxi Permit: फेक परमिट रिन्यूअलला लगाम लागणार! ऑटो-टॅक्सी चालकांची आता बायोमेट्रिक ओळख होणार, RTOचा कडक निर्णय

Latest Marathi News Live Update : भाषांतर करण्यासाठी आलेले प्रश्न हवालदारने इतर आरोपींच्या माध्यमातून पोहचवले

Education Recruitment Update: अशासकीय अनुदानित महाविद्यालयांत ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक भरतीला मंजुरी; आरक्षण अंमलबजावणीसाठी विशेष प्रशिक्षण

पालघरमध्ये मोठा राजकीय भूकंप! शिवसेना-भाजपला खिंडार; बड्या नेत्यांचा बविआमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT