ठाणे शहर, ता. ३१ (बातमीदार)ः तंबाखूमुळे गंभीर आजाराला दूर करण्यासाठी केवळ वैद्यकीय उपचारच नव्हे, तर सामाजिक आणि कुटुंबीय पातळीवर जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे. त्यासाठी तंबाखू, गुटख्यासारख्या घातक पदार्थांच्या सेवनापासून इतरांना दूर राहण्याचे, आवाहन ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी केले.
जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून शनिवारी (ता. ३१) जनजागृतीपर रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत तंबाखूविरोधी फलक, मौखिक स्वच्छतेचे महत्त्व, ब्रश बदलण्याचे अंतर, दंत तपासणीचे अंतर, तोंडात कोणतेही बदल दिसल्यास तत्काळ तपासणी यासंदर्भातील माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी पथनाट्य, रांगोळी स्पर्धा, चित्रकला आणि वक्तृत्व स्पर्धेमार्फत जनजागृती केली. या वेळी तंबाखूमुळे होणारा मौखिक कर्करोग हद्दपार करण्याची जबाबदारी केवळ सरकार, आरोग्य प्रशासनाची नव्हे तर या देशातील प्रत्येक सुज्ञ नागरिकाची असल्याचे कैलास पवार यांनी सांगितले. या रॅलीत अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धीरज महांगडे, डॉ. विलास साळवे, डॉ. सुषमा कांबळे यांच्यासह रुग्णालयातील कर्मचारी सहभागी झाले होते.
ः-------------------------------------------
भारतामध्ये दरवर्षी मौखिक कर्करोगाचे लाखो रुग्ण आढळतात. तोंडात कोणताही पांढरा किंवा लालसर चट्टा, जखम न भरणे, तोंड उघडताना त्रास आदी लक्षणे दिसल्यास तत्काळ जिल्हा रुग्णालयातील दंत विभागाशी संपर्क साधावा.
- डॉ. अर्चना पवार, दंत शल्यचिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय, ठाणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.